‘ये आई वाचव गं मला’, नागपुरात 3 वर्षीय डुग्गुच्या मानीवर-हाथावर कुत्र्यांनी दात भोसकले अन् आईनी पाहताचं…

नागपूर : लहान मुलांवर कधी कोणतं संकट ओढावेल, हे सांगता येत नाही. त्यामुळे त्यांच्यावर सतत लक्ष ठेवावं लागतं. त्यातही कुत्रा हा असा प्राणी आहे, जो हल्ला करू लागला की कोणालाही गंभीर जखमी करू शकतो. अशात एखादं बाळ तर या कुत्र्यांसमोर काहीच नाही. सध्या हेच दाखवणारी एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आह. नागपूरात एका तीन वर्षे मुलावर भटक्या श्वानांनी अचानक हल्ला करीत त्याला गंभीर जखमी केलं.

ही घटना नागपूरच्या वाठोडा पोलीस स्टेशन हद्दीत अनमोल नगरमध्ये घडली आहे. सुदैवाने ही बाब या ३ वर्षीय बाळाच्या आईच्या लक्षात येताच मुलाच्या आईने धाव घेतल्याने मोठी हानी टळली आहे. डुग्गु दुबे असं जखमी चिमुकल्याचं नाव आहे. कुत्र्यांनी हल्ला केल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून या घटनेचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल होत आहे.

डुग्गु रस्त्याने पायी जात होता, इतक्यात त्याच्याजवळ जात पाच ते सहा भटक्या कुत्र्यांनी अचानक त्याच्यावर हल्ला केला आणि त्याला ओढत काही अंतरावर नेलं. हे श्वान ज्या पद्धतीनं मुलाला ओढत आहेत, ते पाहून कोणाचाही थरकाप उडेल. त्यादरम्यान डुग्गुच्या आईचं लक्ष मुलाकडे गेलं आणि हे सगळं पाहून ती धावतच तेथे आली.

तिने दगडाने कुत्र्यांना हाकलून लावलं. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. नागपूर शहरात सर्वत्र भटक्या कुत्र्यांचा वावर असून नागपूर महानगरपालिका याबाबतीत गंभीर नसल्याने एखाद्या मुलाचा जीव गेल्यानंतरच मनपाला जाग येईल का? असा संतप्त सवाल आता सामान्य नागरिक विचारत आहेत. मुलाच्या आईने वेळेत धाव घेतली नसती, तर कदाचित या चिमुकल्याला आपला जीव गमवावा लागला असता.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *