रात्रीचं मुलीचा जन्म, पण तिला पाहण्याची इच्छा अपूर्णच राहिली; हिंगोलीच्या जवानाची सापडली बाॅडी

जालना: नुकत्याच जन्माला आलेल्या आपल्या लेकीला पाहण्यासाठी घरी जात असताना भारतीय सैन्यदलातील एका जवानाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. जालन्यात ही दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेत जवान राहुल ढगे यांचा मृत्यू झाला. आपल्या नवजात लेकीला पाहण्याच्या ओढीने राहुल ढगे घरी निघाले होते. मात्र, वाटेतच काळाने त्यांच्यावर घाला घातला. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

दहा वर्षांपूर्वी म्हणजेच २० मार्च २०१३ ला महार रेजिमेंटमध्ये सैन्य दलात भरती झालेल्या हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात असलेल्या पळशी या गावच्या ३१ वर्षीय राहुल मारुती ढगे या जवानाचा सोमवारी पहाटे रेल्वे अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. काल सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

सैन्यातील जवान राहुल ढगे हे रात्री एक वाजताच्या सुमारास औरंगाबाद- पूर्णा या रेल्वेने पूर्णा येथे जात होते. त्यावेळी जालना शहारा जवळील लोंढेवाडी ते सारवाडीच्या दरम्यान ते रेल्वेतून खाली पडले. काल सकाळी नऊ वाजेच्या सुमारास रेल्वेचे कर्मचारी गस्त घालत असताना अशोककुमार काळूराम वर्मा यांना ते मृत अवस्थेत दिसले.

त्यांनी तात्काळ तालुका जालना पोलिसांना याची माहिती दिल्यावर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून मारुती ढगे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सामान्य रुग्णालयात पाठविला.दरम्यान ढगे यांचे नातेवाईक दुपारच्या सुमारास जालन्यात पोहोचले. त्यांनी ढगे यांचा मृतदेह ताब्यात घेतला. राहुल ढगे यांना २० मार्च रोजी सैन्य दलात भरती होऊन दहा वर्षे पूर्ण होणार होती. १६ जुलै रोजी ते नगर येथे सातव्या महार बटालियनमध्ये बदलून आले होते.

काल रात्री गावाकडे जाण्यासाठी ते रेल्वेने प्रवास करत होते. मात्र, घरी पोहोचण्यापूर्वीच त्यांचा दुर्दैवी अंत झाला. त्यांच्या पश्चात आई- वडील, पत्नी, दोन भाऊ, तीन बहिणी असा मोठा परिवार आहे. दरम्यान नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या पत्नीने रात्रीच एका मुलीलाही जन्म दिल्याचे सांगितले आहे.वसमत तालुक्यातील पळशी या मूळ गावी त्यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *