रात्रीच्या स्वप्नांनी घेतला बारामतीच्या अक्षयचा जीव, सकाळी घरच्यांनी दार उघडले अन् मोठा धक्काचं बसला

बारामती : स्वप्नात वारंवार येत असलेले चोरटे खरोखरच मारहाण करतील, या भीतीने बारामती तालुक्यातील 28 वर्षीय युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार प्रत्यक्षात घडला आहे. अक्षय सुरेश कदम (वय 28, रा. सुपा ता. बारामती) असं तरुणाचं नाव आहे.

अक्षय कदम याने शुक्रवारी (ता. 12) मध्यरात्रीच्या सुमारास साडी बांधून गळफास घेतल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत अक्षयचा मावस भाऊ भाऊ शेखर शेलार याने दिलेल्या तक्रारीनुसार वडगाव निंबाळकर पोलिसात आत्महत्येचा गुन्हा दाखल कण्यात आला आहे.बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय कदम हा सुपा परीसरात मोलमजुरी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता.

मागील कांही दिवसापासून गावात फिरताना आणि मित्रमंडळींना आपणास स्वप्न पडत असल्याचं सांगितलं. आणि या स्वप्नात येणारे चोर मला मारहाण करणार असल्याचे अक्षय सांगत होता.स्वप्नाबद्दल वारंवार सांगत असल्याने त्याच्या मित्रमंडळींनी त्याला वेड्यात काढण्यास सुरुवात केली होती. दरम्यान गुरुवारी त्याने स्वप्नातील चोर मारहाण करणार असल्याची कल्पना घरातील सदस्यांनाही दिली होती.

या संदर्भात घरातील लोकांनी अक्षयची समजूत काढली होती. याच विचारात शक्रवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास अक्षयने घराची दारे-खिडक्या आतून बंद करून झोपण्यास गेला. शनिवारी सकाळी त्याने उशिरापर्यंत दार उघडलं नाही. त्यामुळे सदस्यांनी आत डोकावून पाहिले. अक्षयने पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. वडगाव निंबाळकर पोलिसांनी याबाबत मृत्यूची नोंद केली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे म्हणाले, अक्षय कदम यांच्या मावस भावाने दिलेल्या तक्रारीनुसार अक्षयच्या मृत्यूची नोंद अकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. मात्र गावातील सरपंच व काही नागरीकांच्याकडे विचारणा केली असता, मागील कांही दिवसापासून अक्षय स्वप्नाबद्दल व चोरट्यांच्या मारहाणीबद्दल बोलत होता. शुक्रवारी झोपण्यापूर्वीही याबाबत तो कुटुंबीयांशी बोलला होता. याबाबत पूर्ण तपास केल्यानंतरच अक्षयच्या आत्महत्येचे नेमके कारण कळेल, असं पोलिसांनी सांगितलं.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *