रायगडमध्ये महिला जागा बघायला आली अन् पोराला कॉटेजवर नेलं, सेक्स करतांनाचा सगळं काही….

रायगड : तरुणांना हनीट्रॅपच्या जाळ्यात ओढुन त्यांच्याकडुन लाखो रुपयांची लुट करण्याचे प्रकार सुरू झाले आहेत.असाच एक प्रकार कोकणात रायगड जिल्ह्यात अलिबाग येथे घडला आहे.अलिबाग येथील मुलाला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवुन त्याची video क्लिप तयार केली.

ब्लॅकमेल करुन 5 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या एक महिला व पुरुषाला अलिबाग पोलिसांनी बेड्या ठोकल्या.अवघ्या 24 तासात फिल्मी स्टाईल सापळा रचुन मुंबई येथुन आरोपींना अटक केली आहे.या घटनेतील फिर्यादी तरुणाला अनेकवेळा संशयित आरोपी फोन करून पैशाची मागणी करीत होते.त्यामुळे तो मानसिक तणावात होता.

११ फेब्रुवारी रोजी फिर्यादीला फोन करून आरोपींनी ५ लाखांची रक्कम आणण्यासाठी सांगितले होते.त्यानुसार आरोपींना मुंबईत बोलावण्यात आले होते.पोलीसही साध्या वेषात त्याच्या आजुबाजुला पाळत ठेऊन होते.

जागा बघण्याच्या उद्देशाने आलेली महिला,जागा न पाहता आपल्या सौंदर्याच्या जाळ्यात ओढुन त्याला कॉटेजवर घेऊन गेली.तिथे दोघांनी चाळे केले आणि तिथेच त्याचा घात झाला.मोहजाळात अडकलेल्या तरुणाकडे ५ लाखाची खंडणी मागुन video व्हायरल करण्याची धमकी दिल्याची घटना अलिबाग तालुक्यात घडल्यानंतर चांगलीचं खळबळ उडाली.या प्रकरणी मांडवा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे

५ लाख रुपये कुठे घेऊन यायचे,ते संशयित आरोपी धनश्री तरुणाला सतत फोन करून सांगत होती.अखेर चर्चगेट रेल्वे स्टेशनवर भेटायचे ठरले.त्यानंतर काही वेळाने महिलासुद्धा चर्चगेट रेल्वे स्टेशन येथे आल्याचे लक्षात आले.

थोड्या वेळाने धनश्रीचा भाचा तिथे आला.त्याने महिलेच्या सांगण्यावरून तरुणाकडुन पैशांची पिशवी स्वीकारली.तो जाण्यास निघाला असता पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले.अधिक चौकशी केल्यानंतर महिलेच्या भाच्याचा या गुन्ह्यात सहभाग नसल्याचे पोलिसांना समजले.

त्यानंतर पोलीस पथकाने महिलेची अधिक चौकशी केली असता महिलेने अलिबाग येथील राहणाऱ्या एका व्यक्तीच्या सोबतीने हा गुन्हा केला असल्याची माहिती समोर आली.यावेळी तात्काळ तपास पथकाने तांत्रिक तपासाची मदत घेऊन त्याला देखील ताब्यात घेतलं.दोन्ही आरोपींना गुन्ह्यात अटक करून त्यांची अधिक चौकशी सुरु आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *