लग्नाच्या आशेनं २ लेकरांच्या बापानी मुलीला आळंदी जेजुरी अन् लोणावळा फिरवलं अन् लैंगिक सुखांनतर…
नगर शहरात काही दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलीला तुझ्या प्रियकरासोबत तुझे लग्न लावून देतो असे सांगत तिचे अपहरण करण्याचा प्रकार समोर आलेला होता. आरोपीने तिला सुरुवातीला आळंदी यानंतर जेजुरी आणि नंतर लोणावळा अशा ठिकाणी फिरवले त्यावेळी तिच्यावर अत्याचार केल्याचे देखील समोर आलेले आहे.
उपलब्ध माहितीनुसार, सदर अल्पवयीन मुलगी ही सतरा वर्षीय असून नगर येथील एका महाविद्यालयात शिकते. तोफखाना पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर या मुलीच्या प्रियकरालाच ताब्यात घेऊन तिला खून करण्यास सांगितले होते त्यावेळी तिने आपण लोणावळा येथे विश्वनाथ चिमाजी गडदे ( वय 32 राहणार राहुरी ) याच्यासोबत असल्याचे प्रियकराला सांगितले आणि त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्याला बेड्या ठोकल्या होत्या.
आरोपी हा एक वाहनचालक असून त्याने या मुलीला तुझे तुझ्या प्रियकरासोबत लग्न लावून देतो असे सांगत मुलीला आपल्या जाळ्यात ओढले होते त्यासाठी तू मला दहा हजार रुपये दे अशी देखील त्याने मागणी केली आणि त्यानंतर तो तिला जेजुरीला घेऊन गेला. तिथे गेल्यानंतर त्याने या मुलीच्या मित्राला फोन करून दहा हजार रुपये आणून दे आणि मुलीला घेऊन जा असे सांगितले होते.
मात्र मुलीच्या प्रियकराने पैसे दिले नाही म्हणून त्याने तिच्यावर अत्याचार केला आणि त्यानंतर तिच्या मित्राला फोन करून लोणावळ्याला यायला सांगितले मात्र या प्रियकाराने त्याआधी पोलिसांशी संपर्क केला आणि पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी व्यवस्थित सापळा रचलेला होता.पोलिसांनी ज्यावेळी त्याला बेड्या ठोकल्या त्यावेळी त्याने मोठ्या प्रमाणात मद्यप्राशन केलेले होते. पोलिसांसोबतच त्याने अरेरावी करत यात आपला काही संबंध नाही या दोघांना लग्न करायचे होते म्हणून आपण हे सगळे केले असे सांगू लागला.
पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून आरोपीने आतापर्यंत मुलीच्या पैशातूनच मजा केली आहे . देवदर्शन आणि लॉजिंगचा खर्च देखील या मुलीनेच केला असेच समोर आलेले असून कलम 376 आणि पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवलेला आहे. त्याची दारू उतरल्यानंतर तो माझ्याकडून चूक झाली मला दोन मुले आहेत असे सांगत पोलिसांकडे गयावया करत होता मात्र त्याने केलेला गुन्हा तितकाच गंभीर असल्याने पोलिसांनी त्याचे काहीएक ऐकून घेतले नाही..