लातुरमध्ये लग्नानंतर २ मुलं असतांनाही बाहेर लफडं केलचं, खोट सांगुन तिच्याकडं जायचा अन् पत्नी रुसुन माहेरी जाताचं…
लातूर – पती-पत्नीच्या नात्याची वीण घट्ट करणारा सण असलेल्या वटपाैर्णिमेदिवशी (रविवार)भल्या पहाटे एकाने आपली पत्नी आणि मेहुण्याचा खून केल्याची खळबळजनक घटना भातांगळी (ता. लातूर) येथे घडली.
भातांगळी येथील सुवर्णा नामक मुलीचा थेरगाव (ता. शिरूर अनंतपाळ) येथील विकास भोपळे या तरुणासोबत काही वर्षांपूर्वी विवाह झाला होता. दोघांना एक मुलगा व एक मुलगी अशी अपत्ये आहेत. परंतु या दांपत्यामध्ये सातत्याने भांडणे होत होती. दोघांत सतत भांडणे होत असल्याने चार दिवसांपूर्वीच सुवर्णा माहेरी भातांगळी येथे आली होती. रविवारी भल्या पहाटे साडेचार ते पाच वाजता विकास भोपळे हा भातांगळी येथे गेला.
त्याची पत्नी सुवर्णा माहेरी घरासमोर अंगणात झोपली होती. त्याचवेळी त्याने पत्नी सुवर्णावर तीक्ष्ण हत्याराने वार केले, त्यातच ती ठार झाली. त्याचवेळी विकासने मेहुणा युवराज निरूडे याच्यावरही वार करून त्यालाही ठार केले. त्यानंतर विकास भोपळे हा लातूर ग्रामीण पोलिसांत हजर झाला. जन्मोजन्मी हाच पती हवा असे व्रत करण्याचा आज विवाहितांचा सण, पण याच दिवशी पतीने पत्नी, मेहूण्यास ठार केल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
अनैतिक संबंधातून खून
दरम्यान, मृत सुवर्णाच्या आईने आराेप केला की, सुवर्णाचा पती विकासचे अनैतिक संबंध होते. त्यामध्ये मुलीचा अडथळा ठरत असल्यामुळे तिचा खून केला आहे. या प्रकरणी लातूर ग्रामिण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.