लातुर जिल्ह्यातील जोडप्याचा उत्तर प्रदेशात दुर्देवी अंत, १ महिन्याच्या बाळावरही दया आली नाही

हरदोई : अपघाती घटनांमध्ये मृत्यू होण्याचं प्रमाण सध्या खुप वाढलं असताना आता असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.खोलीला लागलेल्या आगीमध्ये निष्पाप लेकीसह जोडप्याचा होरपळुन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.यामुळे संपुर्ण परिसरात खळबळ उडाली असुन कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,घरात मोठ्या प्रमाणात आग लागल्यामुळे फ्रीजला मोठा तडा गेला आहे.इतकंच नाहीतर घरातील सामानही जळुन खाक झालं.शॉर्ट सर्किटमुळे हि आग लागली असल्याचं सांगण्यात येत आहे.या आगीमध्ये घरात असलेल्या चिमुरड्या मुलासह आई-वडिलांचाही होरपळुन दुर्देवी अंत झाला आहे.या घटनेमुळे संपुर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

बिलग्राम येथील कातारपुर गावातील हि घटना आहे.राकेश दंडवते नावाचा तरुण शेतकरी हा पत्नी पुष्पासह लेकासोबत रहायचा.राकेश दंडवते हा मुळ लातुर जिल्ह्यातील रहिवाशी आहे.हा मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे तो पत्नी पुष्पा आणि १ महिन्याची मुलगी दिव्यांशी हिच्यासोबत खोलीत झोपला होता.रात्री एकच्या सुमारास खोलीला आग लागली.खोलीतून धुर आणि आरडाओरडा ऐकुन शेजारी राहणारे भाऊ व इतर नातेवाईक धावत आले.

बाळानंतर आई-वडिलांचाही मृत्यू…
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल पोहोचलं.घर फोडुन आग विझवण्यात यश आलं.मात्र,तोपर्यंत दिव्यांशीचा आगीत होरपळुन मृत्यू झाला होता.यामध्ये राकेश आणि त्यांची पत्नी पुष्पा खुप खुप भाजले होते.दोघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल केलं असता उपचार सुरू असताना दोघांचीही प्राणज्योत मालवल्याचं पोलिसांनी सांगितलं.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *