लेकानेचं वडिलांचे २५ लहान-लहान तुकडे करुन १०० फुट खोल पुरले, बापाच्या ‘त्या’ वागण्यामुळं मुलाने केले तुकडे

बंगळुरू: कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यामधील मुधोल शहरात एका मुलानं वडिलांची हत्या केली. मुलानं वडिलांच्या मृतदेहाचे तुकडे करून १०० फूट खोल असलेल्या कूपनलिकेत टाकले. मुलानं वडिलांच्या मृतदेहाचे वीसपेक्षा अधिक तुकडे केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. यापैकी ८ तुकडे पोलिसांना सापडले आहेत.

मुधोलमध्ये वास्तव्यास असलेल्या परशुराम कुलाली (५४ वर्षे) यांची मुलगा विट्टाला कुलालीनं (२१ वर्षे) हत्या केली. दोघेही फार्महाऊसमध्ये राहत होते. तर परशुराम यांच्या पत्नी सरस्वती मोठ्या मुलासह बागलकोट शहरात राहतात. ६ डिसेंबरला ही घटना घडली. पोलिसांनी विट्टालाची चौकशी सुरू केली आहे.

वडील परशुराम यांना दारुचं व्यसन होतं. ते दररोज मारहाण करायचे, अशी माहिती विट्टालानं पोलिसांना चौकशीदरम्यान दिली. ६ डिसेंबरला वडिलांनी हल्ला केला. त्यावेळी आपण स्वसंरक्षणार्थ वडिलांवर लोखंडी दांड्यानं हल्ला केल्याचं विट्टालानं पोलिसांनी सांगितलं. परशुराम यांच्या डोक्याला इजा झाली. त्यांनी जागीच जीव सोडल्याची माहिती त्यानं दिली.

गुन्हा उघडकीस येऊ नये यासाठी मृतदेहाचे तुकडे केल्याचं विट्टलानं पोलिसांना सांगितलं. परशुराम अचानक बेपत्ता झाल्यानं स्थानिकांना संशय आला. त्यांनी सोमवारी याची माहिती पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी विट्टलाची चौकशी केली. त्यानं गुन्ह्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी जेसीबीच्या माध्यमातून खोदकाम करून कूपनलिकेत टाकलेले मृतदेहाचे तुकडे बाहेर काढले. पोलिसांना आतापर्यंत ८ तुकडे सापडले आहेत.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *