लेकीच्या लग्नात बापाचा मृत्यू, काकानेही जग सोडलं ; जळगावात शुभकार्यात अघटित घडलं

जळगाव : घरात लग्नाची धामधुम सुरु होती.पुतण्याचं लग्न असल्याने काका तसेच सर्व नातेवाईक आनंदात होते.मात्र,रात्री देव नाचवण्याच्या कार्यक्रमात अघटीत घडलं.या देव नाचवण्याच्या कार्यक्रमात नाचताना नवरदेवाच्या काकाला हार्टअटॅक आल्याने मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना रविवारी रात्री चाळीसगाव तालुक्यातील आडगाव या गावात लपनघरी घडली.पुतण्यावर अक्षता टाकण्यापुर्वी काकाच्या अचानक मृत्यूने सर्व गाव सुन्न झालं आहे.दिनकर मोहन मिस्तरी(वय ४५) असं मृत काकांचे नाव आहे.

दिनकर मिस्तरी यांचा चाळीसगाव तालुक्यातील आडगाव येथील पुतण्या भुषण मिस्तरी याचा २७ फेब्रुवारी रोजी विवाह होणार होता.या विवाहासाठी दिनकर मिस्तरी व त्यांचा भाऊ सुरेश हे दोघेही आपल्या कुंटुबासह आठवडाभरापूर्वीच सुरत येथुन आडगावात आले होते.२६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पुतण्या भुषणला हळद लागली.रात्री अंगणात मोठा मंडप टाकला.रात्री पाहुण्या मंडळीचे जेवण वगैरे झाल्यानंतर देव नाचवण्याचा कार्यक्रम सुरु झाला.

या कार्यक्रमात वर आणि वधु अशा दोन्हींकडची मंडळी उपस्थित होती.यावेळी भुषणचे काका दिनकर हे अगदी साडी नेसुन सर्वांना लाजवेल असे नाचत आनंद लुटत होते.मात्र,नाचता नाचता दिनकर मिस्तरी यांना अचानक हार्टअटॅक आल्याने मृत्यू झाला.या झटक्यात हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.सोहळ्याला उपस्थित नातेवाईकांसह संपुर्ण गाव सुन्न झालं.

मुळचे चाळीसगाव तालुक्यातील आडगाव येथील रहिवासी असलेले दिनकर मिस्तरी हे ४ भाऊ होते.दिनकर आणि भाऊ सुरेश हे दोघेही काही वर्षांपुर्वी व्यवसायानिमित्ताने सुरत येथे कुंटुबासह स्थायिक झाले.तर त्यांचे इतर २ भाऊ अरुण व संजय हे आडगावातच राहत होते.या दोघांचेही निधन झाले आहे.

४ वर्षांपूर्वी संजय मिस्तरी यांच्या लेकीचं लग्न ठरलं होतं.घरातील पहिलंच लग्न असल्याने घरात मोठं आनंदाचं वातावरण होतं.मात्र,यावेळी नियतिना वेगळाचं डाव खेळला.अवघ्या ५ दिवसांवर लग्न सोहळा असताना सकाळी आंघोळ करत असताना संजय यांनाही हार्टअटॅक आला आणि त्यातचं त्यांचा मृत्यू झाला होता.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *