लैला-मजनुचे मंदिरातच अश्लील चाळे, ड्रायव्हरने जाऊन रोखलं; चिडलेल्या तरुणाने क्षणात नको तेचं केलं

रीवा : मध्य प्रदेशमधील रिवा जिल्ह्यामध्ये शनिवारी एक गजब घटना समोर आली आहे.इथे एक प्रेमीयुगुल मंदिरात बसुन अश्लील चाळे करत असताना गावातील वाहनचालकाने त्यांना अडवलं.पण यानंतर रागाच्या भरात मुलाने असं काही केलं की यामुळे संपुर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,मुलगा-मुलगी थेट मंदिरातच रोमँटिक झाले होते.लोकांनी हे पाहिल्यानंतर त्यांना रोखण्यासाठी एक व्यक्ती पुढे गेला.त्याने आपला ट्रक उभा करून मंदिरात जात त्या दोघांना थांबवलं.पण यानंतर रागाच्या भरात प्रियकर असं काही करून बसला की यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

प्रेम करताना अडवल्यामुळे रागात मुलाने थेट ट्रक ड्रायव्हरवर गोळ्या झाडल्या.यानंतर तो आपल्या बाईकवर प्रियसीला घेऊन पळुन गेला.गावकर्यांनी गंभीर अवस्थेमध्ये ड्रायव्हरला रुग्णालयात दाखल केलं असुन त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहे.

दरम्यान,गोळी झाडणाऱ्या आरोपीला पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला.मात्र,तो आपल्या प्रियसीला स्कुटीवर बसवुन गावकऱ्यांनाही बंदुकीचा धाक दाखवुन घटनास्थळावरून पसार झाल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.हा संपुर्ण प्रकार ढाब्यावर लावण्यात आलेल्या cctv कॅमेऱ्यात रेकाॅर्ड झाला आहे तर पोलीस आता त्या आरोपी तरुणाच्या शोधात आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *