लॉजवर मदतीला नवराच आला , ‘ लिव्ह इन ‘ वाला प्रियकर गेला पळून अन् मुंबई पोलिस धडकताचं…

महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना ठाण्यातील अंबरनाथ पूर्व इथे समोर आलेली असून साईलीला नावाच्या एका लॉजमध्ये आपल्या लिव्ह इन पार्टनरशिपसोबत आलेल्या एका 47 वर्षीय महिलेचा संशयास्पदरीत्या मृत्यू झालेला आहे. शुक्रवारी ही घटना समोर आलेली असून तिच्यासोबत लॉजवर आलेला हा व्यक्ती आता फरार झालेला आहे. शिवाजीनगर पोलिसात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, मुंबईतील मीरा रोड परिसरात राहत असलेल्या ठिकाणचा पुरावा घेऊन या दोघांनी 24 जूनपासून रूम बुक केलेली होती. शुक्रवारी सकाळी हॉटेलच्या एका खोलीमध्ये एक महिला मयत अवस्थेत असल्याची खबर शिवाजीनगर पोलिसांना मिळाली. पोलीस तिथे पोहोचले मात्र त्याच्या एक दिवस आधीच तिच्यासोबत राहणारा तिचा जोडीदार हॉटेलमधून फरार झाल्याची माहिती पोलिसांना घटनास्थळी मिळून आली. शहाजहान अख्तर असे मयत महिलेचे नाव आहे.

मयत महिला ही तिचे लग्न झाल्यानंतर तिच्या पतीला सोडून दुसऱ्या एका पुरुषासोबत गेल्या अनेक वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती मात्र ती कुणासोबत राहते आणि काय करते याचा कुणालाच पत्ता नव्हता. अंबरनाथ मधील एका लॉजमध्ये एका 47 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर मयत महिलेचा पती आणि तिची बहीण हे लॉजवर पोहोचले त्यावेळी लॉजमधील माहिती पुस्तकात तिचे नाव आढळून आले. ती राहत असलेल्या रूमचा दरवाजा आतून बंद केलेला होता.

पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यानंतर लॉज चालकाने चावीने रूम उघडल्यानंतर शहाजहान ही मयत अवस्थेत होती. तिचा मृतदेह उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला त्यामध्ये तिचा मृत्यू आजाराने झाल्याचे समोर आलेले आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी याप्रकरणी माहिती दिलेली आहे. तिच्यासोबत असलेला व्यक्ती याचा देखील शोध सुरू आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *