वय ३२, लग्न जुळनां, एकटाच बडबडत बसायचा; रत्नागिरीत तरुणाने केलं भयंकर

रत्नागिरीः लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याने एका युवकाने आपले आयुष्य संपवले आहे. संगमेश्वर तालुक्यातील ३५ वर्षीय युवकाने लग्न जमत नसल्याने नैराश्य आलेल्या तरुणाने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. संगमेश्वर तालुक्यातील कुंभारखाणी खुर्द महाडिकवाडी येथे ही घटना घडली आहे. प्रवीण रघुनाथ भोजने (३२, कुंभारखाणी खुर्द, भोजनेवाडी संगमेश्वर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबतची फिर्याद मृताचा भाऊ अजित भोजने याने संगमेश्वर पोलीस ठाण्यात दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण भोजने याचे लग्न ठरत नसल्याने तो निराश होता. याचा त्याच्या मनावर परिणाम झाला होता. तो वायफळ बडबड करत असे. २ मार्च २०२३ रोजी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास तो काजूच्या झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. त्याला माखजन प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता माखजन येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले.

याबाबत भाऊ अजित भोजने यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संगमेश्वर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी अधिक तपास संगमेश्वर पोलीस करत आहेत.प्रवीण भोजने हा आधी चिपळूण येथे एका हॉटेलमध्ये कामाला होता. मात्र त्याची मानसिक अस्वस्थता वाढू लागल्याने त्याच्या भावाने त्याला आपल्या घरी गावी पाठवून दिले होते. गेले काही महिने त्याचे लग्न ठरत नसल्याने त्याला मानसिक नैराश्याने ग्रासले होते.

तो स्वतःशीच कायम पुटपुटत असायचा. तो गावी आला होता मात्र सकाळच्या सुमारास तो घरातून निघून गेला दुपारच्या सुमारास त्याचा काजूच्या झाडाला गळफास स्थितीत आत्महत्या केल्याचा प्रकार काही ग्रामस्थांनी पाहिला आणि सगळ्यानाच धक्का बसला.या घटनेची माहिती तात्काळ संगमेश्वर पोलिसांना देण्यात आली.

या सगळ्या प्रकारची माहिती मिळताच संगमेश्वर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक श्री. देशमुख हे आपल्या पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. या सगळ्या प्रकरणाचा आता अधिक तपास माखजन पोलीस दुरक्षेत्राचे ए.एस.आय.श्री. कांबळे करत आहेत. प्रवीणच्या पश्चात आई वडील व भाऊ असा परिवार आहे

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *