वर्षभरात करोडपती होण्यासाठी जळगावच्या मजुराचा कारनामा, पिशवीत सापडल्या नोटाचं-नोटा

जळगाव: झपटप पैसे कमवुन श्रीमंत होण्यासाठी मजुर पोराने चक्क नकली नोटा बनविण्याची शक्कल लढविली आहे.युट्यूबरवर video पाहुन नकली नोटा सुध्दा बनविल्या.मात्र,हे कृत्य त्याला चांगलचं महागात पडलं असुन त्याच्यावर जेलची हवा खाण्याची वेळ आली आहे.नकली नोटा बनविणाऱ्या एका मजुर युवकाच्या पोलिसांली मुसक्या आवळल्या असुन त्याच्याकडून तब्बल ४६,००० नकली नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

देविदास पुंडलिक आढाव(वय ३०,राहणार कुसुंबा तालुका,जळगाव) असे अटक केलेल्या संशयित तरुणाचे नाव आहे.कुसुंबा गावातील देविदास आढाव हा एमआयडीसीतील v sector येथे भारतीय चलनाच्या नकली नोटा तयार करून त्या बाजारात वापर करत असल्याची गोपनीय माहिती पोलीस उपअधिक्षक संदिप गावित यांना मिळाली.

त्यानुसार,रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख,चंद्रकांत पाटील,पोलीस नाईक रेवानंद साळुंखे,पोलीस कॉन्स्टेबल विजय जाधव आणि सचिन साळुंखे यांनी बुधवारी एमआयडीसीच्या v sector मध्ये सापळा रचुन संशयित तरुणाला रंगेहात पकडुन अटक केली.

त्याच्याजवळ सापडलेल्या कापडी पिशवीत जवळपास ४६ हजाराच्या नकली नोटा आढळुन आल्या.त्याने भारतीय चलनातील १००,२०० आणि ५०० रुपयांच्या हुबेहुब नोटा झापल्या होत्या.युट्यूबवर video पाहुन या नकली नोटा तयार केल्याची कबुली संशयित देविदास याने दिली आहे.याप्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नकली नोटा तयार करुन त्या वापरात आणण्याची टोळी असल्याचा संशय पोलिसांना आहे.यात देविदाससोबत अजुनही काही लोकांचा समावेश आहे का याचाही पोलिसांकडून शोध सुरु आहे.दरम्यान,संशयित आरोपी देविदास याला पोलिसांनी जिल्हा न्यायालयात हजर केले.न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.दरम्यान या घटनेचा अधिक तपास पोलिस करत आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *