वाढदिवशीचं आईशेजारी दीड वर्षाच्या लेकीची बाॅडी पडलेली… वर्ध्याच्या माय-लेकीला पदरामुळं जीव गमवावा लागला

वर्धा : पत्नी आणि दीड वर्षीय दोन मुलींना दुचाकीवर बसवून नेरपिंगळाई येथे लग्नसमारंभात जात असतानाच मागून भरधाव आलेल्या टँकरने दुचाकीला हुलकावणी दिली. यात दुचाकी अनियंत्रीत झाली. त्यामुळे पत्नी आणि एक दीड वर्षीय मुलगी टँकरच्या मागील चाकात चिरडल्या गेल्या. या अपघातात मायलेकीचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात बाजारवाडा फाटा परिसरात झाला.

निलिमा राजकुमार सयाम (वय २७), तनुष्का राजकुमार सयाम अशी मृतकांची नावे आहे. तर राजकुमार नामदेव सयाम (वय २७) आणि दीड वर्षीय मुलगी रियांशी ही किरकोळ जखमी झाली आहे.

विरुळ येथील रहिवासी राजकुमार सयाम हे विरुळ येथून दुचाकीने पत्नी आणि दोन जुळ्या मुलींना घेऊन मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळाई येथे आयोजित लग्न सोहळ्यात जात होते. दरम्यान, बाजारवाडा फाट्याजवळ मागून आलेल्या एका भरधाव टँकर चालकाने दुचाकीला ओव्हरटेक करुन हुलकावणी दिली. त्यामुळे राजकुमार यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. पत्नी निलिमा यांच्या साडीचा पदर दुचाकीच्या चेनमध्ये फसल्याने त्या एका दीड वर्षीय चिमुरडीसह रस्त्यावर पडल्या. खाली पडताच दोघेही टँकरच्या मागील चाकात येऊन चिरडल्या गेल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. तसेच राजकुमार आणि त्यांच्याजवळ समोर बसलेली मुलगी जखमी झाली आहे.

राजकुमार सयाम हे गावातील प्रतिष्ठीत व्यक्ती आहेत. त्यांचा २७ मे रोजी वाढदिवस होता. मात्र, जन्मदिनीच त्याच्या कुटुंबावर काळाने झडप घातली आणि पत्नी व दीड वर्षीय मुलीने जग सोडले. ही घटना मनाला चटका लावून गेली. या घटनेनं विरुळ परिसरात शोककळा पसरली आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *