वायफायच सामान आणायचं म्हणून महिलेला दौंडमधुन पुण्यातल्या लॉजवर आणलं अन् महिलेला कळायच्या आत….

पुणे जिल्ह्यात एक खळबळजनक अशी घटना दौंड तालुक्यात समोर आलेली असून एका विवाहित महिलेला अनेकदा कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अनेक वेळा बलात्कार करण्याचा प्रकार समोर आलेला आहे. सदर प्रकरणी एका व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, मयूर रमेश भोसले ( राहणार दौंड जिल्हा पुणे ) असे आरोपी व्यक्तीचे नाव असून महिला आणि आरोपी यांच्यात सोशल मीडियावरून ओळख झालेली होती त्यानंतर मयूर याने तिला वायफायच्या दुकानात कामाला देखील ठेवलेले होते. पुणे येथे काही आपल्याला वायफायचे सामान आणायचे आहे.

म्हणून तो तिच्यासोबत दौंड इथून निघाला आणि पुण्याला आल्यानंतर एका लॉजवर त्याने कोल्ड्रिंकमध्ये तिला गुंगीचे औषध देऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले.2022 पासून अशाच पद्धतीने त्याने अनेकवेळा तिला कोल्ड्रिंक पाजले आणि त्यानंतर तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. या प्रकाराचा फोटो आणि व्हिडिओ त्याने काढलेले होते. पीडित महिलेने त्याला लग्नासाठी तगादा सुरू केला मात्र तो सतत लग्नाला नकार देत होता.

अखेर त्याने या तरुणीच्या घरी जाऊन तिला मारहाण केली आणि तिच्या वडिलांना देखील दमदाटी करत तुमच्या मुलीला मारून टाकेल अशी धमकी दिली. पीडित महिला आणि तिचे पती यांच्यात घटस्फोट झालेला असल्याने काम शोधण्याच्या बहाण्याने सोशल मीडियावर त्यांची ओळख झालेली होती.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *