‘ वो बुलाती है मगर‘ , लातुरचा ड्रायव्हर तिच्यामागं नगरच्या घरी गेला, झटक्यात कपडे काढले पण तिसरचं झालं…

नगर जिल्ह्यात हनीट्रॅपचा एक अजब प्रकार जामखेड इथे समोर आलेला असून एका महिलेने एका ट्रकचालकाला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून आपल्या जाळ्यात ओढलेले होते त्यानंतर 11 तारखेला त्याला जामखेड इथे बोलवण्यात आले आणि महिलेच्या नातेवाईकांनी त्याला बेदम मारहाण करत अर्धनग्न अवस्थेतील त्याचे फोटो काढले. फोनच्या आधारे तपास करत पोलिसांनी अखेर ट्रॅपचा पर्दाफाश केलेला असून एका आरोपीला अटक करण्यात आलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, पीडित तक्रारदार व्यक्ती हा लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील रहिवासी असून फेसबुकवर या महिलेची त्याच्यासोबत ओळख झालेली होती त्यानंतर तिने त्याच्यासोबत प्रेमाच्या गप्पा मारत त्याला आपल्या जाळ्यात ओढले आणि 18 तारखेला तिच्या घरी ती त्याला घेऊन गेली.

त्याचवेळी महिलेचे काही कथित नातेवाईक तिथे आले आणि त्यांनी या ट्रकचालकाला मारहाण करत त्याला अर्धनग्न केले सोबतच त्या महिलेसोबत त्याचे फोटो काढले आणि अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत त्याला पैशाची मागणी केली. आपल्याकडील सर्व पैसे त्याने महिलेला दिले मात्र आणखीन पैसे मिळावेत म्हणून त्याला डांबून ठेवण्यात आले सोबतच त्याच्या बायकोला फोन करून पैशाची मागणी करण्यात आली.

ट्रकचालकाच्या पत्नीला पैशासाठी फोन आल्यानंतर तिने आपल्याकडे पैसे नाहीत असे सांगितले त्यामुळे आरोपी आणखीनच खवळले आणि त्यांनी तिला शिवीगाळ केली त्यानंतर तिने 112 नंबर वर फोन केला आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे अवघ्या काही मिनिटात पोलिसांच्या पथकाला या रॅकेटची माहिती समजली. आरोपी महिला आणि तिच्या नातेवाईकांच्या विरोधात वेगवेगळ्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलीस निरीक्षक महेश पाटील , सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असल्याची माहिती आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *