” शेणखावऱ्या सुरमेश बेटकर….”श्रमेश तु हास्यजत्रेच्या दलालीवर जगतो अन् तु जर पुन्हा असं केलं तर तुला…

मुंबई/सांगली : “सकाळपासून एकच गोष्ट कळत नाहीये, टोमॅटो फ्रिजमध्ये ठेवू की बँकेत?” अशी इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता श्रमेश बेटकर याने सोशल मीडियावर चर्चेला तोंड फोडलं होतं. श्रमेशच्या पोस्टला आता थेट माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी इशारा दिला आहे. सांगलीतील भातवडे तालुका वाळवा येथील शेतकऱ्यांनी श्रमेशच्या पोस्टरवर चिखल फेकून निषेध व्यक्त केला.

रोजच्या जेवणामध्ये वापरला जाणारे टोमॅटो महाग झाल्याने सर्वसामान्यांच्या बजेटचं गणित बिघडलं आहे. नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी १ किलो टोमॅटोसाठी १२० रुपये मोजावे लागत होते, तर काही ठिकाणी हा दर १५० रुपये किलोवर पोहोचला आहे.महाराष्ट्राची हास्यजत्रा या सोनी मराठीवरील कार्यक्रमातून लोकप्रिय झालेला अभिनेता श्रमेश बेटकरने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली होती. आपल्या प्रसिद्ध अकबर-सलीम स्किटमधील स्वत:चा फोटो शेअर करत त्याने टोमॅटोच्या दरासंदर्भात भाष्य केले होते.

माजी मंत्री सदाभाऊ खोत यांचा संताप
“श्रमेश बेटकर हा शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलेला नाही, टोमॅटोचा भाव वाढताच हा त्यावर विनोद करतो, टोमॅटो फ्रिजमध्ये ठेवू की बँकेत? टोमॅटो काय फॉरेन करन्सी आहे की त्याला स्विस बँकेत लागेल.. तुला लई टोमॅटोचा जुस आवडतो, टोमॅटो आवडतो तर गावाकडे ये, शेतीत ये, टोमॅटो लाव, निंदायला बस, फवारणी कर, मग तुझी हास्यजत्रा कशी होत्या बघ तुला कळेल.. बिन पाण्याची घेऊन तू नाचायला लागशील.” असा बोचरा वार माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केल्याची माहिती आहे.

“श्रमेश बेडकर हा हास्यजत्रेच्या दलालीवर जगतो आणि कष्टकरी शेतकऱ्यांवर विनोद करतो. आम्ही शेतकऱ्यांनी पिकवलेलं खातो. पुन्हा असे विनोद झाले तर श्रमेशला टोमॅटोच्या ज्यूससहित आणखी बरेच काही दिले जाईल” असंही खोत म्हणाले.

पोस्टवर काय लिहिलंय?
“शेतकऱ्यांची शेतमालाची खिल्ली उडवणाऱ्या हास्यजत्रा फेम शेणखावऱ्या सुरमेश बेटकर कुठं खातो फुकटचा टमाटा, हास्य जत्राच्या दलाली वरती तू झाला कावरा बावरा” असं लिहिलेल्या पोस्टरवर चिखल फेकून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी महिला शेतकरी रयत क्रांतीचे बजरंग भोसले, इतर पदाधिकारी, कार्यकर्ते व वाळवा तालुक्यातील अनेक शेतकरी उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *