शेतातून गेल्याचा राग, शाळकरी मुलाला संपवलं; आत्महत्येचा बनाव रचून मृतदेह झाडाला टांगला

बीड : माझ्या शेतातून कशाला जातोस म्हणत अवघ्या पंधरा वर्षीय विद्यार्थ्याला मारहाण करून त्याचा खून करण्यात आला. त्यानंतर त्या मुलाने आत्महत्या वाटावी यासाठी ओढणीच्या साहाय्याने झाडाला टांगल्याची खळबळ जनक घटना माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलीस हद्दीत काल सकाळी उघडकीस आली आहे.

नेत्रुड येथील इयत्ता नववीच्या वर्गात शिकत असलेला विद्यार्थी गुलाम मोहम्मद मुर्तजा शेख हा १५ वर्षीय मुलगा त्याची लहान बहीण सिमरन आणि छोटा भाऊ असेफर यांना सोबत घेऊन आपल्या आजोबांच्या शेतात मंगळवारी सकाळी सात वाजता सरपन आणण्यासाठी गेला होता. शेतात जात असताना दत्ता माणिक डाके यांच्या शेतात कैलास डाके, महादेव डाके, हनुमंत वानखेडे या तिघांनी त्याचा रस्ता अडवला.

आमच्या शेतातून का जातोस म्हणत गुलामला त्यांनी जमिनीवर पाडून मारहाण करण्यात सुरुवात केली. सरपणासाठी नेलेल्या ओढणीने तिघेजण गुलामचा गळा आवळत असताना घाबरलेल्या सिमरन आणि उजेब याने घराकडे पळत काढला. घरी जाऊन घडलेला सर्व प्रकार आई-वडिलांना सांगितला. गुलामचे वडील मूर्तजा शेख यांच्यासह नातेवाईकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.

यावेळी पालखी महामार्गावरील नेतृत्व पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शेतात लिंबाच्या झाडाला गुलामचा मृतदेह लटकवलेला अवस्थेत नातेवाईकांना आढळला. या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. या घटनेची माहिती होताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी माजलगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे.

शवविच्छेदनानंतर सायंकाळी नेत्रुड येथे शोकाकुल वातावरणात गुलाम मोहम्मद मूर्तजा शेख याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान मृत्यू झालेल्या गुलामचे वडील शेख यांच्या तक्रारीवरुन कैलास उर्फ पिंटू शिवाजी डाके, महादेव सुंदरराव डाके राहणार नित्रुड आणि हनुमंत वानखेडे राहणार टालेवाडी, यांच्यावर गुलाम यांची हत्या केल्याप्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे. दिंद्रुड पोलिसांनी यातील मुख्य आरोपी कैलास उर्फ पिंटू डाके याला सायंकाळी ताब्यात घेतलं असून पुढील तपास आणि आरोपीचा शोध पोलीस प्रशासन घेत आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *