शेवटी लालमातीतचं घेतला अखेरचा श्वास, पुण्यात ३१ वर्षीय पैलवानाचा भयंकर मृत्यू

पुणे : व्यायाम करत असताना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने एका पैलवानाचा मृत्यू झाल्याची घटना पुण्यात घडली आहे.पैलवानाला तात्काळ हाॅस्पिटलमध्ये नेण्यात आले,मात्र तोपर्यंत खुप उशिर झाला होता.तपासुन डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.स्वप्नील पाडाळे असे 31 वर्षीय मृत पैलवानाचे नाव आहे.पुण्यातील मारुंजी येथील कुस्तीच्या तालमीत आज सकाळी 7.30 च्या सुमारास हि दुर्दैवी घटना घडली.स्वप्निलच्या आकस्मित मृत्यूमुळे कुस्ती खेळाच्या विश्वात शोकांतिका पसरली आहे.

सराव करतांना हार्टअटॅक
या घटने संबंधित अधिक माहिती अशी कि,स्वप्निल हा नेहमीप्रमाणे सरावासाठी मारुंजी या ठिकाणी असलेल्या कुस्तीच्या तालमीत गेला होता.कुस्तीसाठी सराव करताना पैलवानांना सपाट्या मारायच्या असल्यामुळे स्वप्नीलसुध्दा व्यायाम करत होता.व्यायाम करताना स्वप्नीलला अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि तो खाली पडला.

तात्काळ नेले रुग्णालयात
स्वप्नीन अचानक खाली पडल्याचे पाहताच तालमितील इतर पैलवांनानी त्याला तात्काळ हाॅस्पिटलमध्ये दाखल केले.मात्र त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता.स्वप्नीलने मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलनातुन कुस्तीचे प्रशिक्षण घेतले असुन,तो सध्या वेगवेगळ्या ठिकाणी मुलांना कुस्ती शिकवायचा.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *