संभाजीनगरच्या केशवची बहिणीसोबत शेवटची भाऊबीज, बहिण धायमोकळुन रडली

छत्रपती संभाजीनगर : दिवाळीची धामधूम झाल्यानंतर सासरवाशी मुलगी भाऊबीजेला माहेरी येत असते. (Sambhajinagar) यामुळे दिवाळीनंतर भाऊबीजसाठी बहिणीला घ्यायला गेलेल्या भावाचा अपघात (Accident) झाला आणि त्याचा मृत्यू झाला. यामुळे भाऊबीजच्या दिवशीच भावाला गमावल्याचे दुःख बहिणीवर ओढवले आहे. (Maharashtra News)

छत्रपती संभाजीनगर शहरातील पैठण रोडवरच्या कांचनवाडी परिसरात हा अपघात झाला आहे. संभाजीनगरातील कांचनवाडी परिसरात राहत असलेल्या बहिणीला भाऊबीजेसाठी घेऊन जाण्यासाठी केशव विठ्ठल भिसे (वय २३) आणि सुरेश परदेशी गुरुजी (वय ७५, रा. बालम टाकली) यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. दुचाकीने संभाजीनगर शहरात येत असताना टँकर व २ दुचाकीचा अपघात झाला. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

भाऊबीजची अखेरची आठवण
भाऊबीजनिमित्ताने (Bhaubeej) बहिणीला घेऊन जाऊ या उद्देशाने केशव भिसे हा बहिणीच्या घरी आला होता. परंतु भाऊबिजेच्या दिवशीच भावाला हिरवल्याचे दुःख बहिणीवर ओढवले आहे. यामुळे आपल्या लाडक्या भाऊरायासोबतची यंदा अखेरची भाऊबीज ठरली आहे.

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *