संभाजीनगरमध्ये विद्यार्थीनीला बायकोचं लोटायची प्राध्यापक पतीच्या बेडरुममध्ये, नजर ठेवायची; कारण खुपचं हौश उ़डवणारं

संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून देणाऱ्या छत्रपती संभाजीनगर येथील प्राध्यापकाच्या लैंगिक अत्याचार प्रकरणात गुन्हा दाखल होऊन वीस दिवस झाले मात्र तरी देखील हा प्राध्यापक कुटुंबासोबत फरार असल्याची माहिती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील हा प्राध्यापक असून तो आणि त्याच्या पत्नीच्या विरोधात बेगमपुरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आलेला असून अद्यापही पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, डॉक्टर अशोक बंडगर असे आरोपी प्राध्यापकाचे नाव असून अत्यंत सुखवस्तू कुटुंबातील या डॉक्टरने या प्राध्यापकाने काही दिवसांपूर्वी मसाल्याचा व्यवसाय सुरू केलेला होता. त्यात देखील त्याची मोठ्या प्रमाणात भरभराट झाली. डॉक्टरला दोन्ही मुली असून आपल्या संपत्तीला वारस यासाठी त्याने एका गरीब कुटुंबातील विद्यार्थिनीला मदतीचे आश्वासन दिले.

स्वतःच्या घरात पेइंग गेस्ट म्हणून काही दिवस ठेवले त्यानंतर तिच्यावर अत्याचार करण्यात आले. प्रकरण पोलिसात गेल्यानंतर प्राध्यापकाच्या पत्नीने देखील पतीचीच बाजू घेतली हे पाहून पोलीस देखील हैराण झालेले होते. पोलीस तपासात पत्नी हीच या पिढीत मुलीला त्याच्या बेडरूममध्ये पाठवून देत होती हे समोर आल्यानंतर पोलिसांनी देखील कपाळाला हात लावला.

25 एप्रिल रोजी गुन्हा दाखल होण्याची माहिती झाली आणि त्यानंतर आरोपी हा तात्काळ फरार झालेला होता. विद्यापीठ प्रशासनाने दुसऱ्या दिवशी त्याचे निलंबन केलेले असून अद्यापही तो या चौकशीला समोर गेलेला नाही. जिल्हा सत्र न्यायालयात त्याने धाव घेतलेली होती मात्र त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला पोलिसांना देखील तो अद्यापपर्यंत सापडलेला नाही. आतापर्यंतच्या पोलिस तपासात आरोपी दांपत्याला त्यांच्या संपत्तीसाठी वारस हवा होता मात्र बंडगर यांच्या पत्नीला आधीच्या दोन मुली असल्याकारणाने आता मुलगा होणार नाही याचा अंदाज आल्यानंतर बंडगर याने या विद्यार्थिनीला आपल्या घरी गेस्ट म्हणून आणलेले होते त्यानंतर तिच्या तिला प्रेमाच्या जाळ्यात बायकोच्या मदतीने अडकवण्यात आले आणि तिच्यावर अत्याचार करण्यात आले.

पीडित तरुणी ही गरीब कुटुंबातील असून आरोपींनी तिच्याकडून मुलगा झाल्यानंतर तिला हाकलून द्यायचे असाही प्लॅन केलेला होता मात्र या प्रकरणाचा तिला अंदाज आला आणि तिने आत्महत्येचा देखील विचार केलेला होता मात्र याच दरम्यान तिची सामाजिक कार्य करणाऱ्या एका महिला वकीलासोबत ओळख झाली आणि त्यानंतर प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलेले होते. अद्यापही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आलेला नसल्याने पोलिसांच्या कार्यशैलीवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *