संभाजीनगरमध्ये १३ वर्षाच्या धाडशी लेकीने वाचवला बापाचा जीव, दम लागला पण बापासाठी तिने…

संभाजीनगर: वडिल आत्महत्या करण्यासाठी निघाले होते,लेकीला याची कुणकुण लागताचं तिने कुठलाही विचार न करता तडक पोलिस स्टेशन गाठले आणि आपल्या बापाला आत्महत्येपासुन वाचवले.लेक वडिलांचा आधार होत असतानाच आज एका मुलीने आपल्या वडिलांचे प्राण वाचवले आहे.छत्रपती संभाजीनगरमध्ये हि घटना घडली आहे.या मुलीच्या धाडसाची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

आई शेतात गेल्यानंतर घरी १३ वर्षीय मुलीसह वडील दोघेच होते.दरम्यान वडील आत्महत्या करण्यासाठी घरावर चढले.त्यावेळी घाबरलेल्या मुलीने धापा काढत पोलीस ठाणे गाठले.माझे बाबा आत्महत्या करण्यासाठी घरावर चढले,त्यांना प्लीज वाचवा अशी विनवणी करीत पोलिसांना घेऊन आली आणि फासावर चढलेल्या वडिलांना वाचविले.हि घटना सोयगावात घडली.या घटनेनंतर तत्परता दाखविणाऱ्या पोलिसांचे आणि समयसुचकता दाखविणाऱ्या मुलीचे गावभर कौतुक होत आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की,दुपारचे १ वाजले होते.सोयगाव पोलीस ठाण्यात ठरल्याप्रमाणे कामकाज सुरू होते.दरम्यान एक १३ वर्षीय मुलगी अत्यंत भेदरलेल्या अवस्थेत धापा टाकत पोलीस ठाण्यात आली.

तेथे उपस्थित पोलिसांना विनवणी करीत सर माझे बाबा घरावर आत्महत्या करण्यासाठी चढले आहे.त्यांना वाचवा प्लीज अशी विनवणी केली.उपस्थित आमलदाराने पटकन पोलिस अमलदार गणेश रोकडे यांना फोन करून भावानीनगर येथे एक व्यक्ती आत्महत्या करत असल्याची माहिती दिली.

रोकडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.पोहचल्यावर एक ३८ वर्षीय व्यक्ती गॅलरीमध्ये दोरी बांधुन गळफास घेतांना दिसला.त्या व्यक्तीने पोलीस आल्याचे पाहताचं गळ्यात दोर टाकुन उडी घेतली.मात्र नागरे यांनी धाव घेत व्यक्तीला उचलुन धरले व इतर नागरिकांना हाक मारत बोलावुन घेत त्याला फसवरून खाली उतरवले.पोलिसांनी सतर्कता दाखवल्याने एका व्यक्तीचे प्राण वाचले.यामुळे पोलिसांच्या या सतर्कतेचे शहरात कौतुक होत आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *