सकाळी मोठ्याचा तर सायंकाळी लहान्याचा जीव गेला, नगरमध्ये भांवडांच्या मृ्त्यूने आई-वडिलांना धक्का

अहमदनगर : अहमदनगर मधील टाकळी काझी गावात तीन मुलांना लिंबू सरबत पिल्याने विषबाधा झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत दोन चिमुरड्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शिवराज बापू म्हस्के (वय ४.५ वर्ष) आणि स्वराज बापू म्हस्के (वय १.५ वर्ष) अशी मृत्यू झालेल्या चिमुकल्यांची नावं आहेत.

सार्थक भाऊसाहेब म्हस्के या १४ वर्षीय मुलावर खासगी रुग्णलयात उपाचार सुरु आहेत. वडील बापू म्हस्के हे गवंडी काम करतात तर आई स्वप्नाली बापू म्हस्के या घर काम करतात. दोन्ही मुलं गेल्यानं आई-बापावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलांनी स्वत: लिंबू सरबत बनवलं होत. त्यानंतर त्यांना उलटीचा त्रास होऊ लागला आणि त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान, एका मुलाचा सकाळी तर एका मुलाचा सायंकाळी मृत्यू झाला. तर तिसऱ्या मुलावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *