सगळ्यांच्याचं उडाल्या झोपा! महाराष्ट्रातला भिकारी निघाला कोंटीचा मालक अन् रोजची कमाई तर विचारुचं नका
मुंबई: भिकारी शब्द म्हटला की डोळ्यासमोर एक विशिष्ट प्रतिमा उभी राहते. भिकारी म्हणजे गरीब असं समीकरण आपल्या डोक्यात फिट्ट असतं. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत, चेहऱ्यावर अगतिकता, डोळ्यांत असहाय भाव घेऊन फिरणारे अनेक भिकारी आपण रोज पाहतो. दिवसभरात यांना किती पैसे मिळत असतील, त्यातून त्यांचं पोट तरी भरत असेल का, हे अभागी जीव कुठे राहत असतील, असे विचार आपल्या मनात येतात. पण एखादा व्यक्ती पेशानं भिकारी असेल तर? आणि तो जगातला सर्वात श्रीमंत भिकारी असेल तर?
मुंबईत राहणारा भरत जैन देशातलाच नव्हे, तर जगातला सर्वात श्रीमंत भिकारी आहे. आर्थिक परिस्थिती अतिशय वाईट असल्यानं भरतला शिक्षण घेता आलं नाही. भरत विवाहित असून त्याला दोन मुलं आहेत. आपल्याला शिक्षण घेता आलं नाही, पण आपली मुलं शिकायला हवीत असं भरतला वाटायचं. त्यांचं शिक्षण पूर्ण झालं आहे. भरत जैनची एकूण संपत्ती साडे सात कोटी रुपयांच्या घरात जाते. त्याचं महिन्याचं उत्पन्न ६० ते ७५ हजार रुपयांच्या दरम्यान आहे.
जैनचे मुंबईत दोन फ्लॅट आहेत. त्यांचं मूल्य १.४ कोटी रुपये आहे. ठाण्यात दोन दुकानं आहेत. त्यातून त्याला महिन्याकाठी भाड्यापोटी ३० हजार रुपये मिळतात. भरत जैन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, आझाद मैदान परिसरात भीक मागतो.जगातील सर्वात श्रीमंत भिकारी अशी भरत जैनची ओळख आहे. तो दररोज १० ते १२ तास काम करतो.
त्यातून त्याला दोन हजार ते अडीच हजार रुपये मिळतात. भरत जैन परळमध्ये १ बीएचके ड्युप्लेक्समध्ये राहतो. भरतच्या कुटुंबानं त्याला अनेकदा भीक मागू नका, असं सांगून पाहिलं. त्याला समजावण्याचे अनेक प्रयत्न केले. मात्र काहीच उपयोग झाला नाही. भरत जैननं भीक मागणं सुरुच ठेवलं. भरत जैनची कॉव्हेंट शाळेत शिकली. त्याच्या कुटुंबातील काही सदस्य स्टेशनरी दुकान चालवतात.