सगळ्यांनीचं लाजा सोडल्या, ५ शाळकरी मुलींकडुन दिव्यांग मुलीला लाथा-बुक्यांनी मारहाण, पुण्यातील संतापजनक प्रकार

पुणे : दिवसेंदिवस सोशल मीडियाची क्रेझ वाढत चालली आहे. स्वत: सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. तसेच सतत चर्चेत येण्यासाठी अनेकजण स्टटंदेखील करताना दिसतात. मात्र, हेच काहीवेळा त्यांच्याच अंगलट देखील येत.

सध्या सोशल मीडियावर प्रसिध्दीसाठी व्हिडिओ बनवणाऱ्या मुलींच्या राड्याचा व्हिडिओ आता समोर आलाय. ज्यामध्ये त्या कडाक्याचं भांडण करताना दिसत आहेत.मुलींच्या हाणामारीची समोर आलेली घटना ही पुण्याची आहे. चित्रपटात शोभेल अशा पद्धतीने भर चौकात शाळकरी मुलींनी एका मुलीवर हल्ला चढवत केसांना धरुन ओढत नेत मारहाण केली. संतापजनक बाब म्हणजे, ज्या मुलीला मारहाण करण्यात आली ती मुलगी दिव्यांग होती.

भेदरलेल्या अवस्थेत घरी आलेल्या मुलीला पाहून आई वडिलांना धक्का बसला. मुलींविषयी तक्रार दाखल झाल्यावर गैरसमजुतीतून या दिव्यांग मुलीला मारहाण केल्याचे त्यांनी सांगितले. व्हिडिओ शेअर करून आपली इमेज बनवणे हा त्याच्या मागचा हेतू होता हे उघड झालं आहे. पोलिसांनी या मुलींचे समुपदेशन करून त्या मुलींना सोडून दिलं.

“राडा…कंपनी…गँगस्टर…विषय करायचा नाय ताई” असं व्हिडिओला नाव देऊन व्हिडिओ शेअर केला होता. या मुलींनी आपली टोळी बनवली होती. एकत्रितपणे विविध ठिकाणांना भेटी देणे, वाढदिवस साजरे करणे, रील्स बनवणे आणि समाजमाध्यमावर फॉलोअर्स वाढवणे हे त्यांचे काम. व्हिडिओ शेअर करून आपली इमेज आणि ओळख बनवतात. तसाच हा व्हिडिओ प्रसिद्ध होण्यासाठी सोशल मीडियावर व्हायरल केला होता, असं समोर आलं आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *