सरकारी शाळेच्या शिक्षिकेने रात्री नदीवर भेटायला बोलावलं, २ तास दारुच्या नशेत शारिरीक भुख भागवली अन्…

Crime News: राजस्थानमध्ये (Rajasthan) प्रेयसीनेच आपल्या प्रियकराची गळा दाबून हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 3 जुलै रोजी नरेंद्र कुमार जेवल्यानंतर आपल्या प्रेयसीशी गप्पा मारत घराबाहेर पडला होता. पण रात्रभर घरी परतला नाही तेव्हा त्याच्या कुटुंबाने पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. यानंतर त्याचा मृतदेह सापडला होता.

पोलिसांनी याप्रकरणी त्याची प्रेयसी कुमारी हिनाला अटक केली आहे. पोलीस तपासात, 10 वर्षं दोघांमध्ये प्रेमसंबंध होते अशी माहिती समोर आली. पण नंतर दोघांमध्ये भांडणं सुरु झाली होती. यातूनच प्रेयसीने त्याच्या हत्येचा कट आखला होता. उदयपूरच्या खेरवाडा पोलीस ठाणे क्षेत्रात ही घटना घडली आहे. 26 वर्षीय नरेंद्र आपल्या आई, भावोजी आणि छोटा भाऊ सतीश कुमार यांच्यासह राहत होता.

त्याची 25 वर्षीय प्रेयसी हिना कुमारी मीना लराठी येथे राहत होती. हिना गावातील सरकारी शाळेत शिक्षिका आहे. तर नरेंद्र बीएच्या दुसऱ्या वर्षाला शिकत होता. दोघांमध्ये 10 वर्षं प्रेमसंबंध होते. दोघांमध्ये रोज फोनवरुन बोलणं होत होतं. तसंच भेटही होत होती.

3 जुलैच्या रात्री नरेंद्र जेवल्यानंतर घराबाहेर पडला होता. पण तो रात्रभर घऱी परतलाच नाही. यामुळे कुटुंबाला चिंता सतावू लागली होती. दुसऱ्या दिवशी कुटुंबीयांनी शेजारी, नातेवाईक आणि नरेंद्रच्या मित्रांकडे विचारणा केली. पण काही माहिती मिळत नव्हती. यादरम्यान नातेवाईकांना सोम नदीच्या जवळ एका तरुणाचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली. कुटुंबाने धाव घेतली असता मृतदेह नरेंद्रचा असल्याचं समोर आलं. यानंतर कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी सर्वात आधी नरेंद्रच्या आई आणि भावाची चौकशी करत त्याचं कोणाशी शत्रुत्व होतं का? किंवा कोणावर संशय आहे का? याची माहिती घेतली. पण पोलिसांना काही ठोस माहिती मिळाली नाही. पण तो घराबाहेर पडला तेव्हा आपल्या प्रेयसीशी बोलत होता ही माहिती कुटुंबाने दिली. पोलिसांनी नरेंद्र आणि हिना यांच्या मोबाइल नंबरचं लोकेशन मिळवलं असता दोघे रात्रभर एकाच ठिकाणी होते अशी माहिती मिळाली. यानंतर पोलिसांचा संशय हिनावर बळावला.

8 जुलैला पोलिसांनी हिनाला ताब्यात घेऊन चौकशी केला असता तिने गुन्हा कबूल केला. नरेंद्र आपल्यावर संशय घ्यायचा. त्याला माझे दुसऱ्याशी संबंध आहेत असं वाटायचं. तो नेहमी मला भेटायला बोलवायचा आणि पैशांची मागणी करायचा. यामुळे मी कंटाळली होती असं तिने सांगितलं.

3 जुलैला हिनाने नरेंद्रला फोन करुन नदीकाठी भेटायला बोलावलं होतं. रात्री 1.30 ते 3.30 वाजेपर्यंत दोघे सोबत होते. नरेंद्र यावेळी दारुच्या नशेत होता. यावेळी त्याने हिनासह शारिरीक संबंध प्रस्थापित केले. नरेंद्रने हिनाकडे पैसे मागितले असता दोघांमध्ये भांडण सुरु झालं. यावेळी नरेंद्रने मला मार नाहीतर मी तुला मारुन टाकेन असं म्हटलं. भांडणं इतकं वाढलं की, हिनाने स्कार्फने नरेंद्रची गळा दाबून हत्या केली.

पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी हिनाने नरेंद्रच्या गंजीचा गळफास बनवत त्याच्या गळ्यात बांधला. नंतर मृतदेह फरफटत नदीत फेकून दिला. त्यावर एक मोठा दगडही ठेवून दिला, जेणेकरुन मृतदेह बाहेर येऊ नये. यानंतर ती तेथून फरार झाली. दरम्यान, गुन्हा कबूल केल्यानंतर पोलिसांनी हिनाला अटक केली आहे.

दरम्यान, या हत्येमध्ये एकटी हिना सहभागी नसून अजूनही आरोपी असतील अशी शंका ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. हिना पोलिसांना अर्धवट माहिती देत असल्याचा आरोप आहे. इतर कारणामुळे नरेंद्रची हत्या झाल्याचा त्यांचा दावा आहे. पोलिसांनी हिनाला अटक केली असून, अजून कोणी सहभागी आहेत का याचा तपास करत आहेत.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *