|

सांगलीच्या भामट्या जोडप्याला मध्य प्रदेशात अटक, आगोदार बक्कळ पैसा कमावला अन्….

मध्य प्रदेश : शेअर बाजारात तिप्पट नफ्याचे आमिष दाखवत ५ जणांना 65 लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना मध्य प्रदेशातील सिडकोमधुन उघडकीस आली आहे.याप्रकरणी भामट्या पती-पत्नी विरोधात प्रतापनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहेय.

पैसे गुंतवणूक करुन १ वर्षाहुन अधिक काळ लोटला तरी नफाही मिळाला नाही आणि पैसेही परत केले नाहीत.यामुळे फसवणुक झाल्याचे लक्षात येताच गुंतवणुकदारांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

2018 मध्ये फिर्यादींची आरोपींशी ओळख झाली
हरीश कोलार आणि त्यांच्या पत्नीची फेब्रुवारी 2018 मध्ये दीपक कुराणी आणि हिना कुराणी यांच्याशी भेट झाली होती.कुराणी दाम्पत्य हे सध्या मिनेप चौकात राहत असुन ते मुळचे महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील रहिवाशी आहे.

यावेळी रिअल इस्टेट आणि शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास तिप्पट नफा मिळेल,असे आमिष कुराणी दाम्पत्याने कोलार दाम्पत्याला दाखवले.कुराणी दाम्पत्यावर विश्वास ठेवुन कोलार यांनी त्यांच्याकडे 41 लाख सोपवले.

नफा मिळवुन देण्याचे आमिष
यानंतर कोलार यांनी आपल्या ४ मित्रांना या स्कीमबद्दल माहिती दिली.त्यांच्यासोबत त्यांच्या ४ मित्रांनी कुराणी दाम्पत्याकडे गुंतवणुक केली.26 फेब्रुवारी 2018 ते 12 ऑक्टोबर 2021 दरम्यान ५ जणांनी कुराणी दाम्पत्याकडे तब्बल 65 लाख रुपये दिले.

मात्र कुराणी दाम्पत्याने गुंतवणुकदारांना कुठलाही नफा दिला नाही.शिवाय पैसे देखील परत केले नाहीत.याबाबत गुंतवणुकदारांकडुन वारंवार विचारणा करण्यात आली.

पैसे परत करण्यास टाळाटाळ करु लागल्याने फसवणुक उघड
कुराणी दाम्पत्य काही ना काही कारण सांगुन टाळाटाळ करत होते.अखेर कोलार यांनी सिडको पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे धाव घेतली.त्यानंतर पोलिसांनी या भामट्या दाम्पत्याला अटक केली आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *