सांगलीत आराम करत असलेल्या शिक्षक आईला दोरीने गळा आवळुन मारलं मग गळफास घेतला ; त्याआधी चिठ्ठीत लिहलं

आष्टा येथील दत्त वसाहतीमध्ये मुलाने वृद्ध आईचा गळा आवळून खून केला. यानंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. ही घटना मंगळवारी घडली.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार रतन रामचंद्र कांबळे (वय ८०) या त्यांचा मुलगा शशिकांत कांबळे (वय ४७) याच्या पत्नी व दोन मुलांसह दत्त वसाहत येथे वास्तव्यास आहेत. शशिकांत याचे वडील रामचंद्र कांबळे व आई रतन कांबळे दोघेही प्राथमिक शिक्षक होते. वडिलांचे काही वर्षापूर्वी निधन झाले. शशिकांत याचे आष्टा शहरात कापड दुकान आहे. मंगळवारी पत्नी व मुले माहेरी गेल्याने आई व शशिकांत दोघेही घरी एकत्र होते.

शशिकांत यास दम्याचा आजार होता. यातून त्याला नैराश्य आले होते. या नैराश्यातून त्याने कॉटवर विश्रांती घेत असलेल्या आईचा नायलॉनच्या दोरीने गळा आवळून खून केला. या नैराश्यातच त्याने दुसऱ्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. यावेळी शशिकांत याने आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली असून यात माझ्या आजारपणाला कंटाळून आत्महत्या करत आहे. आईला सांभाळण्यास कोणी नसल्याने मी आईला माझ्यासोबत घेऊन जात आहे, असे लिहिले आहे.

घटनास्थळी आष्टा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित सिद ,सहाय्यक पोलीस निरीक्षक रावसाहेब बाबर, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक दीपक सदामते ,संजय सनदी, राजू पाटील, हवालदार अभिजीत धनगर ,अमोल शिंदे ,नितीन पाटील ,समद मुजावर ,बाळासाहेब काकतकर, प्रवीण ढेपले यांनी भेट देत तपास केला.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *