सांगलीत विवाहित दिरासोबत वहिनीना लाॅजवर रुम बुक केली, २ दिवस बाहेर पडलीचं नाही पण…

सांगली : अनैतिक संबंधातून झालेल्या वादातून चुलत दिराने वहिनीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सांगली जिल्ह्यात आटपाडी शहरातील एका लॉजवर हे हत्याकांड घडले. महिलेचे डोके भिंतीवर आपटून आणि गळा दाबून तिचा खून केल्याचा आरोप आहे.

छाया देवडकर असं मयत ३३ वर्षीय विवाहितेचं नाव आहे. महिलेच्या पतीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी महिलेचा चुलत दीर नानासो हणमंत देवडकर याला ताब्यात घेतले आहे.छाया देवडकर आटपाडीतील विठ्ठल नगर परिसरात पती आणि दोन मुलांसह राहत होत्या. कौटुंबिक वादामुळे हे कुटुंब गावातून आटपाडीत राहायला आले होते.

शनिवारी सकाळी बाजार समितीच्या समोरील एका लॉजच्या खोली नंबर चारमधून कर्मचाऱ्यांना दुर्गंधी येऊ लागली. त्यांनी खोलीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला मात्र यश आले नाही. त्यामुळे त्यांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली. खोलीचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता छाया देवडकर यांचा मृतदेह आढळून आला.

गुरुवार चार मे रोजी नानासो हणमंत देवडकर याने ही खोली दोघांच्या नावे राहण्यासाठी बुक केली होती. दोघेही खोलीत राहायला आले. तिथे दोघांमध्ये पूर्वीच्या अनैतिक संबंधावरुन जोरदार वाद झाला. या वादातून दिने चुलत वहिनीचे डोके भिंतीवर आपटून आणि गळा दाबून तिचा खून केल्याचा संशय आहे. हत्येनंतर त्याने घटनास्थळावरुन पोबारा केला होता. मात्र दोन दिवसांनी मृतदेहाची दुर्गंधी पसरल्यानंतर ही घटना उघडकीस आली.

नानासो देवडकर याचाही विवाह झाला असून त्याला दोन मुलं आहेत. लॉजच्या रजिस्टरवर असलेल्या नोंदीच्या आधारे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. छाया देवडकर यांचा मृतदेह पोलिसांनी शव विच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *