सांगलीला निघताना मुंबईत नवऱ्याला आधी लुटलं अन् नंतर भामट्या बायकोचा पुढचा प्लॅन ऐकुन नवर्याचं डोकचं बंद

मुंबई : पतीचे आठ लाख रुपये किमतीचे सोने आणि रोख रक्कम चोरल्यानंतर प्रियकरासह पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या ३१ वर्षीय महिलेला सोमवारी अटक करण्यात आली. सांगलीला जाण्याआधी स्वतःच्याच घरात विवाहितेने डल्ला मारला होता, मात्र आपण घरी नसताना घरफोडी झाल्याचा बनाव तिने रचला. चोरीचा आळ स्वतःवर येऊ नये, म्हणून महिला नऊ महिने थांबली, पण त्यापूर्वी पोलिसांनी तिला बेड्या ठोकल्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पायल ज्योतिराम शेडगे असे आरोपी महिलेचे नाव आहे. ती मुंबईतील मालाड पूर्व भागाता तिच्या पतीसोबत राहत होती. लुटलेल्या मालासकट प्रियकरासह पळून जाण्यासाठी ती चोरीचा मामला शांत होण्याची वाट पाहत होती, मात्र त्याआधीच पोलिसांनी तिच्या मुसक्या आवळल्या.

खरं तर ही घटना गेल्या वर्षी म्हणजेच ७ मे २०२२ रोजी घडली होती. फिर्यादी पती ज्योतिराम शेडगे यांनी पोलिसांना सांगितले की, सकाळी सात वाजताच्या सुमारास ते त्यांची कार धुण्यासाठी बाहेर पडले होते, तेव्हा त्यांची पत्नी सांगलीला जाण्यासाठी घरी एकटी पॅकिंग करत होती. अर्ध्या तासानंतर पायल गाडीजवळ ज्योतिरामला भेटली आणि त्यानंतर शेडगे दाम्पत्य थेट सांगलीकडे निघाले.

१३ मे रोजी ते परत आले असता ज्योतिराम यांना दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. तर कपाटाच्या लॉकरमधून रोख आणि सोन्याचे दागिने असा ८ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल गायब होता. त्यानंतर ज्योतिराम यांनी कुरार पोलिस ठाण्यात जाऊन अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी गुन्हा नोंदवल्यानंतर घटनास्थळाची पाहणी केली असता दरवाजाचे कुलूप आणि तिजोरी स्क्रू ड्रायव्हरने तोडल्याचे आढळले. मात्र ते फ्लॅटमध्ये सापडला नाही, असे कुरार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश गाढवे यांनी सांगितले. त्यानंतर आम्ही फॉरेन्सिक लॅब तज्ज्ञांना गुन्ह्याच्या ठिकाणाहून बोटांचे ठसे आणि इतर पुरावे घेण्यासाठी बोलावल्याचे पोलिसांनी सांगितले.

या वर्षी २८ फेब्रुवारी रोजी पोलिसांना न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडून अहवाल प्राप्त झाला. त्यांना बाहेरील कोणत्याही व्यक्तीच्या बोटांचे ठसे सापडले नाहीत. तपासानंतर पोलिसांना घराच्या मुख्य दरवाजाचे लॅच आतून तुटल्याचे आढळले.

त्यानंतर पोलिसांनी पायलची कसून चौकशी केली असता, तिने सांगलीला निघताना सोने आणि रोकड लुटल्याची कबुली दिली आणि घरफोडीचा बनाव केल्याचेही सांगितले. मालाड पश्चिमेकडील मालवणी येथे राहणाऱ्या तिच्या प्रियकराला तिने चोरीचा ऐवज सुपूर्द केला होता. पायलने तिच्या प्रियकरासोबत पळून जाण्याची योजना आखली होती आणि तिच्यावर संशय येऊ नये म्हणून ती ही केस शांत होण्याची वाट पाहत होती, असेही पोलिसांनी सांगितले.पायलने पोलिसांना सांगितले की, तिचा प्रियकरही चोरीत सामील होता. पोलीस आता तिच्या प्रियकराचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *