सातार्यात वडिलांच्या एका चुकीने घेतला ८ वर्षाच्या शौर्यचा जीव, पुर्ण बाॅडीतुन रक्त वहायचं, डोक्याचा चेंदामेंदा
सातारा : जिल्ह्यातील वर्धनगड घाटामध्ये लक्ष्मी आई मंदिरानजीक ट्रॅक्टर खाली सापडून आठ वर्षाचा बालकाचा जागीच ठार झाला. शौर्य राजेंद्र काकडे (वय ८, रा. कोरेगाव, जि. सातारा) असे मृत बालकाचे नाव आहे. डोळ्यादेखत मुलगा जागीच ठार झाल्याचे पाहून त्याच्या आई-वडिलांनी हंबरडा फोडला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कोरेगाव येथील काकडे कुटुंबातील शौर्य राजेंद्र काकडे हा आठ वर्षाचा मुलगा आपल्या आई-वडिलांसोबत मोटारसायकल (एमएच ४२ डब्ल्यू २४०९) वरून कोरेगावहून पुसेगावकडे जात होते. त्यावेळी वर्धनगड (ता. खटाव) घाटामध्ये लक्ष्मीआई मंदिराजवळ रस्त्याने खत भरून जाणाऱ्या डबल ट्रॉली ट्रॅक्टरला कॉर्नरवर ओव्हरटेक करीत होते.
तेव्हा असताना पुढून वाहन आल्याने ट्रॅक्टरला ओव्हरटेक करता आले नाही. त्याक्षणी मोटारसायकल चालक शौर्यचे वडील राजेंद्र काकडे यांचा मोटारसायकलवरील ताबा सुटला. काकडे यांचा तोल सुटल्याने त्यांचा मुलगा शौर्य हा खाली रस्त्यावर पडून ट्रॅक्टर ट्रॉलीच्या मागील चाकाखाली आला. ट्रॅक्टर ट्रॉलीचे चाक त्याच्या डोक्यावरून गेल्याने तो जागीच ठार झाला.
मुलगा जागीच ठार झाल्याचे पाहून त्याच्या आई-वडिलांनी हंबरडा फोडला. ते दृश्य पाहताना अपघातस्थळी उपस्थितांचे काळीज पिळवटून टाकणारा क्षण होता. ही घटना घडल्यानंतर रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांनी अपघात स्थळी थांबवून मदत कार्य सुरू केले. या घटनेची माहिती नागरिकांनी पुसेगाव पोलीस ठाण्यात फोनवरून कळवली.
घटनेची माहिती मिळताच पुसेगाव पोलीस अपघातस्थळी दाखल झाले. मुलास उपचारासाठी रुग्णवाहिकेतून पुसेगाव आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पुसेगाव पोलीस या घटनेचा तपास करीत आहे. रात्री उशिरा या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून रस्ते अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. प्रवाशांनी वाहतूक नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. दुचाकी चालवताना वाहनचालकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाकडून सातत्यानं करण्यात येत असताना देखील नागरिकांकडून नियमांचं पालन होत नसल्याचं चित्र अनेकदा पाहयाला मिळतं.