सापावर गोळ्या झाडल्या…पण त्याचाचं गेम झाला खल्लास, सापाला राग आल्यावर पठ्याचा कार्यक्रम

मुंबई: जसं पेराल तसं उगवेल,जसं कर्म कराल तसचं फळ तुम्हाला मिळेल.हे तर तुम्हाला माहितीच आहे.मग ते कर्म जसं तसंच त्याचं फळही असतं.जर ते चांगलं असेल तर चांगलं आणि वाईट असेल तर वाईट फळ.असाच एक video सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.ज्यात मुक्या जीवाच्या जीवावर उठलेल्या एका इसमाला त्याच्या कर्माचं तिथल्या तिथं फळ मिळालं आहे.या व्यक्तीने सापावर गोळीबार गेला आणि त्याच्या पुढच्याच सेकंदात त्याच्यासोबत भयंकर घडलं.

साप म्हटलं तरी अनेकांच्या अंगाला पाणी सुटतं.पण काही लोक असे आहेत जे या खतरनाक सापाशीही पंगा घेण्याचं धाडस दाखवते.या व्यक्तीनेही तेच केलं.त्याने सापाला जागीचं मारण्याचा प्रयत्न केला.पण सापाचा जीव घेण्याचा प्रयत्न त्याच्याच अंगाशी आली.त्याच्यासोबत असं काही उलटचं घडलं ज्याचा त्याने स्वप्नातही विचार केला नसेल.व्हिडीओचा शेवट पाहुनच सगळ्याचांच अंगावर अक्षरशः काटा आला आहे.

video मध्ये तुम्ही पाहु शकता जमिनीवर एक साप फणा काढुन बसलेला दिसतो आहे.त्याच्यापुढं गाडीत एक व्यक्ती बसलेला होता.जिने हातात बंदुक धरली आहे.तो व्यक्ती सापावर बंदुकीतुन गोळ्या झाडते.एकामागोमाग अशा ३ गोळ्या तो झाडतो.गोळीबारात सापाला तर काही इजा झाली नाही.३ गोळ्या झाडताचं मात्र साप रागावला आणि तो थेट त्या व्यक्तीवर झेप घेतो.साप संतप्त होतो आणि बदला घेण्यासाठी वेगाने त्याच्यावर हल्ला करतो.

वन्यजीव आणि मुक्क्या प्राण्यांचे अनेक धक्कादायक video सोशल मीडियावर येत असतात.यातील अनेक video इतके काळजाला भिडणारे असातत की ते पाहुनच लोकांचा दिवस चांगला जातो.न्यजीव प्रेमींसाठी हे video एखाद्या मेजवानीपेक्षा कमी नसतात.पण काही video असेही असतात ज्यामध्ये या प्राण्यांशी माणसांचं वागणं अत्यंत संतापजनक असतं.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *