‘सायली बरी आहे ना पप्पा’ ,बहिणीची काळजी; रायगडच्या भावनानी सोडलं जग

रायगड: जिल्ह्यात रोहा तालुक्यातील वरसे भुवनेश्वर कालवा रोड येथे १३ नोव्हेंबर रोजी मनोहर अंभजी घोसाळकर यांच्या घरात गॅस सिलेंडरचा मोठा स्फोट झाला होता. या स्फोटात गंभीर जखमी झालेल्या भावना घोसाळकरचा अखेर मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या भीषण स्फोटात मनोहर घोसाळकर यांच्यासह त्यांच्या दोन मुली सायली घोसाळकर (१७) आणि भावना घोसाळकर (२४) या गंभीर जखमी झाल्या होत्या. प्रकृती गंभीर असल्याने भावना हिला पुढील उपचारासाठी मुंबई येथील हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले होते. स्फोटात जबर भाजलेली भावना तब्बल ५ दिवस हॉस्पिटलमध्ये जीवन – मरणाच्या उंबरठ्यावर होती. अखेर तिची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. उपचार सुरु असताना शुक्रवार दिनांक १७ नोव्हेंबर रोजी रात्री भावनेने हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला.

काबाडकष्ट करून कोसळकर कुटुंबीय आपला जीवनगाडा हाकत होते. मात्र आपल्या तरुण आणि हसतमुख मुलीला अवघ्या २४ व्या वर्षी जगाचा निरोप घ्यावा लागल्याने त्यांच्या दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने घोसाळकर कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. भुवनेश्वर परिसरातही शोककळा पसरली आहे. या प्रकरणाची नोंद रोहा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास रोहा पोलीस करत आहेत.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *