सासूला घरात एकटं पाहून जावयाची नियत फिरली; चहात गुंगीचं औषध टाकुन विवस्त्र अवस्थेत सासुचे…
Uttar Pradesh Crime News: सासू आणि जावई यांचे नाते आई आणि मुलाप्रमाणे असते. सासू हीच दुसरी आई असते, असं अनेकजण मानतात. पण, आताच्या कलियुगात माणूस नात्यातील मर्यादा सोडून वागत आहे. याचाच प्रत्यय नुकताच एका घटनेतून आला आहे. एका जावयाने अक्षरश: सासू आणि जावयाच्या पवित्र नात्यालाच काळीमा फासत असे काही कृत्य केले की सासूला चारचौघात तोंड लपवायला जागाच उरली नाही. (Breaking Marathi News)
एका जावयाने आपल्या सासूला चहातून गुंगीचे औषध दिले. सासू बेशुद्ध होताच त्याने तिच्यावर बलात्कार केला. इतकंच नाही तर, त्याने बलात्कार करताना अश्लिल फोटो आणि व्हिडीओ देखील काढले. त्यानंतर ही छायाचित्रे दाखवून त्याने तिला ब्लॅकमेल करायला सुरूवात केली. तिला पुन्हा तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितले.
परंतू सासू त्याच्या वासनेला हाणून पाडत थेट पोलिसांत (Police) धाव घेतली. सासूने दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी जावयाला अटक केली असून त्याच्याविरोधात विविध कलमान्वे गुन्हा दाखल केला आहे. नात्याला काळीमा फासणारी ही घटना उत्तरप्रदेशातील बांदा जिल्ह्यात घडली आहे. या घटनेनं परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे.
अनिल असं आरोपी जावयाचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला बांदा जिल्ह्यातील कालिंजर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात राहते. या महिलेच्या मुलीचे वर्षभरापूर्वी पैलानी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील रहिवाशी असलेला आरोपी अनिल याच्यासोबत लग्न झालं होतं. (Latest Marathi News)
अनिल एके दिवशी या महिलेच्या घरी आला. आपल्या पाहुण्याचे स्वागत आणि पाहुणचार म्हणून या महिलेने त्याच्यासाठी चहा बनविला. तेव्हा जावयाने त्याला पाणी प्यायचे आहे असे सांगितले. त्यामुळे त्या पाणी आणण्यासाठी आत स्वयंपाक घरात गेल्या. त्याचा फायदा उचलत त्याने आपल्या घरात कोणी नाही हे पाहून त्याने चहात बेशुद्धीचे औषधे घातले.
त्यानंतर तिने जावयासोबत चहा घेतला. चहा घेताच ती महिला बेशुद्ध झाली. त्यानंतर जावयाने तिच्यावर अतिप्रसंग (Crime News) केला. अब्रु लज्जेखातर बदनामीच्या भीतीने तिने ही बाब कोणालाच सांगितली नाही. काही दिवसांनी जावई पुन्हा घरी आला आणि त्याने पुन्हा तिला तिची अश्लिल छायाचित्रे दाखविली आणि पुन्हा शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितले.
परंतू सासूने त्यास स्पष्ट नकार देत पुन्हा असे केल्यास पोलिसांकडे जाण्याची धमकी दिली. परंतू गोष्टीचा जावयावर काहीही परिणाम झाला नाही. त्याने सासूला ब्लॅकमेल करणे सुरूच ठेवले. अखेर होणाऱ्या त्रासाला कंटाळून पीडित महिलेने पोलिसांत धाव घेतली. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी जावयाला अटक केली आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.