सिंधुदुर्गात लग्न झाल्यानंतरही मेव्हणीकडं आकर्षित झाला दाजी, बायकोच्या मैत्रिणीवर प्रेम अन् खेळचं झाला

वेंगुर्ले: तालुक्यातील मठ- कणकेवाडी येथील सायली यशवंत गावडे (२०) या युवतीचा मृतदेह शेजारीलच आडेली- वेतोरे हद्दीतील सीमेवरील एका बागेत आढळून आल्याने खळबळ उडाली. दरम्यान याप्रकरणी तिच्या जवळच्या मैत्रिणीचा नवरा परुळे येथील गोविंद उर्फ वैभव दाजी माधव याने ओढणीने तिचा गळा आवळून खून केल्याची कबुली दिली आहे. हा खून सायलीने प्रेमसंबंध नाकारल्याने केला असावा असा अंदाज असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी दिली आहे.

कुडाळ येथे एका खासगी रुग्णालयात कामानिमित्त जाणारी सायली शनिवारी २७ ऑगस्ट सायंकाळपासून बेपत्ता होती. यामुळे तिचे वडील यशवंत लवू गावडे यांनी २८ ऑगस्ट रोजी सकाळी ती बेपत्ता असल्याची खबर वेंगुर्ला पोलिसात दिली. दरम्यान तिचा मृतदेह रविवारी रात्री ११.३० च्या सुमारास वाजता काजूच्या बागेत वेतोरेतील एका युवकाला हा निदर्शनास आला.

यावेळी घटनास्थळी तात्काळ पोलीस निरीक्षक अतुल जाधव, पोलीस कोन्स्टेबल सुरेश पाटील, योगेश वेंगुर्लेकर, बंटी सावंत हे दाखल झाले. पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, अप्पर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी सोळंके, गुन्हा अन्वेषण विभागाचे निरीक्षक संदीप भोसले, सहाय्यक निरीक्षक महेश घाग व पोलीस टीम घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करण्यात आला.

गळा दाबून खून केल्याचा संशय
सायली हिच्या डोक्याच्या पाठीमागे दुखापत झाली होती तर तोंडावर मारहाणीचे निशाण होते व नाकातून रक्त येत होते. तसेच तिच्या गळ्याभोवती काळा व्रण दिसून आला असल्याने तिचा गळा दाबून हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. यानंतर हा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला आहे.

प्रेमसंबंध नाकारल्याने केले कृत्य
यावेळी कुटुंबियांनी पोलिसांना दिलेल्या महितीनुसार गोविंद माधव सहित ४ संशयिताना पोलिसांनी रात्रीच ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. यावेळी सायली हिने प्रेमसंबंध नाकारल्याने तिच्याच ओढणीने तिचा गळा आवळून व हाताने मारहाण करून गोविंद माधव यानेच तिचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी सांगितले.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *