सीएच्या परीक्षेत नापास, तणावातुन संभाजीनगरमध्ये ३२ वर्षीय महिलेनी केली आत्महत्या, ६ वर्षाचा चिमुरडा मागं
Chhatrapati Sambhajinagar News : सीएची तयारी तयारी करणाऱ्या 32 वर्षीय विवाहित महिलेने राहत्या घरामध्ये सिलिंग फॅनला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शहरातील अजबनगर भागात उघडकीस आली आहे.सुषमा महेश नेवारे वय 32 असं गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. ही घटना गुरुवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यामध्ये आकस्मित कृतीची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. (Latest Marathi News)
पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, सुषमा यांचं माहेर छत्रपती संभाजीनगर असून त्यांच बीकॉम पर्यंत शिक्षण झालेलं आहे. अभ्यासात त्या हुशार होत्या. दरम्यान सात वर्षांपूर्वी सुषमा यांचा महेश नेवारे यांच्याशी विवाह झाला. त्यांना सहा वर्षाचा मुलगा आहे.सुषमा यांचे पती महेश हे एका खासगी बँकेमध्ये नोकरी करतात. सुषमा या अभ्यासात हुशार असल्यामुळे त्यांनी सीएची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला होता.
गेल्या काही दिवसांपासून त्या सीए परीक्षेची तयारी करत होत्या. सहा महिन्यांपूर्वी त्या सीएच्या परीक्षेमध्ये अनुत्तीर्ण झाल्या होत्या, यामुळे तेव्हापासून त्या तणावात होत्या. त्यानंतर गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास सुषमा यांनी अतून दार लावून सिलिंग फॅनला साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
थोड्यावेळाने मुलगा खाली आला त्यानं आईला आवाज दिला पण आतून प्रतिसाद आला नाही. यामुळे त्याने शेजारच्या खिडकीतून बघितलं असता सुषमा नेवारे दोरीला लटकलेल्या दिसल्यानं त्याने आरडाओरोड केला. यावेळी नातेवाईकांनी दरवाजा तोडून सुषमा यांना तात्काळ साठी रुग्णालयात दाखल केले यावेळी डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.