सुनांनी छळलं म्हणुन घऱ सोडलं अन् आज सासुबाई झाली लखपती; जो तो अचंबित झाला

हैदराबाद :आंध्र प्रदेशमधील नालगौंडा येथील मिरयालगुडा भागातल्या एका सासुची कहाणी तुम्ही ऐकाल तर अचंबित व्हाल. या वृद्धेकडे तिच्या सुनांनी दुर्लक्ष केले. तिने चक्क भीक मागायला सुरुवात केली. पण भीक मागून तिने इतके पैसे कमवले की ती लखपती झाली!

पेंतम्मा असं या महिलेचं नाव. तिला दोन मुलगे आहेत. पतीच्या निधनानंतर ती सर्वस्वी मुलांवर अवलंबून होती. थोडी जमीन होती, ती विकून दोन लाख रुपये मिळाले होते. तिने एक लाख मुलांना दिले आणि एक लाख स्वत:जवळ ठेवले. काही काळाने एका मुलाचा मृत्यू झाला आणि दुसरा घर सोडून पळून गेला.

दोन्ही सुनांनी म्हाताऱ्या सासूकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली. ती उपाशी राहू लागली. म्हणून मग तिने कंटाळून घर सोडलं आणि हैदराबादला आली. पोटासाठी भीक मागू लागली.पोलिसांनी कुठल्याशा चौकशी अभियानात तिची झडती घेतली तेव्हा तिच्याकडे नोटाच्या नोटा पाहून पोलीसही थक्क झाले. पेंतम्माकडे एकूण २ लाख ३४ हजार तीनशे वीस रुपये सापडले.

एक सोन्याची साखली आणि चांदीचे दागिनेही सापडले. चौकशी केल्यावर तिने आपली हकीकत सांगितली. त्यानंतर पोलिसांनी एका बँकेत तिचं खातं उघडून दिलं आणि पैसे जमा केले. तिला पोलिसांनी पुनर्वसन केंद्रात पाठवलं.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *