सुवासिनींच्या हळदीकुंकवाच्या कार्यक्रमात तलाठी भाऊसाहेबांनी घेतली लाच ; प्रत्येक चौकात तलाठ्याची चर्चा
सोशल मीडियावर सध्या एका तलाठी भाऊसाहेबांची जोरदार चर्चा चालू असून हे महाशय सांगलीतील जत तालुक्यातील करजगी येथील आहेत. जत तालुक्याच्या तलाठी संघटनेचे अध्यक्ष अशी त्यांची ओळख असून चांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना त्यांच्या शेततळ्याजवळ लाच घेताना पकडले आहे. ‘ आपल्या घरी धार्मिक कार्यक्रम असल्याने आज बाहेर येऊ शकत नाही लाच घेऊन तुम्ही घरीच या ‘ असे त्यांनी तक्रारदार यांना सांगितले होते.
घरात सुवासिनींचा हळदीकुंकवाचा कार्यक्रम सुरू असतानाच एसीबीने त्यांना रंगेहाथ पकडलेले असून असल्याने त्यांच्या या कारनाम्याची जोरदार चर्चा सुरू झालेली आहे. आपल्या गावात शेततळे बांधलेले असल्याने त्या तळ्याचे पूजन आणि सुवासिनींसाठी हळदीकुंकवाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता त्यावेळी या महाशयांनी लाच स्वीकारली आहे .
बाळासाहेब शंकर जगताप असे या महोदयांचे नाव असून ते करजगी येथील तलाठी भाऊसाहेब आहेत. तक्रारदार व्यक्ती यांचे बांधकाम सध्या सुरू असून बांधकामासाठी आलेल्या वाळूचा त्यांनी बेकायदा साठा केलेला आहे म्हणून कारवाई न करण्यासाठी या भाऊसाहेबांनी त्यांच्याकडे 50 हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदार व्यक्ती यांनी 10 64 या टोल फ्री नंबरवर संपर्क केला आणि त्यानंतर पथक सक्रिय झाले.
तलाठी भाऊसाहेब यांच्या गुड्डापूर रोडवरील आसंगी या ठिकाणी त्यांना रंगेहाथ पकडण्यासाठी पथकाने सापळा रचलेला होता त्यावेळी एकीकडे महिलांच्या हळदीकुंकवाची गडबड तर दुसरीकडे हे महाशय पन्नास हजार रुपयांची लाच स्वीकारत होते त्याचवेळी त्यांना पकडण्यात आले . पोलिस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यापूर्वी देखील हेच महाशय अशाच कारवाईत अडकलेले होते ते प्रकरण सध्या न्यायालयात सुरू आहे.