सोलापुरच्या माय-लेकीच्या कांडनी पोलिसासहं अख्ख गाव हादरलं, आता जेलची हावा खाणार

विटा : पैशासाठी मुलीचे खोटे लग्न लावुन देऊन दत्तात्रय नागेश हसबे(वय ३१ ता. खानापूर) या युवकाला १ लाख ७५ हजार रुपयांना गंडा घालण्यात आला.याप्रकरणी सोलापुर व कर्नाटक राज्यातील ५ जणांविरुद्ध विटा पोलिसांत गुन्हा दाखल आहे.जयश्री गदगे(कर्नाटक), सुनील दत्तात्रय शहा(कर्नाटक),धनम्मा उर्फ धानुबाई नागनाथ बिराजदार,मुलीची आई दीपाली विकास शिंदे व नवरी मुलगी प्रियांका विकास शिंदे(सोलापूर) अशी आरोपीची नावे आहेत.मुलीची आई दीपाली हि ४० वर्षाची असुन प्रियांका हि २१ वर्षाची आहे.

हिवरे येथील दत्तात्रय हसबे या तरुणाचं लग्न जमत नव्हतं.त्यामुळे हसबे हा त्याचा जोडीदार संजय खिलारी याच्या ओळखीच्या कर्नाटकातील जयश्री गदगे या लग्न जुळविणाऱ्या महिलेकडे दोघेजण गेले.त्यावेळी महिलेनी सोलापूर येथे एक चांगली मुलगी असल्याचं सुचवलं.

परंतु,मुलीच्या घरच्यांना १ लाख व लग्न जुळविणारे एजंट सुनील शहा व धानुबाई बिराजदार यांना ७०,००० रुपये द्यावे लागतील,असे सांगितले.मोबाइलवर मुलगी प्रियांका शिंदे हिचा फोटो पाहुन हसबे हे पैसे देण्यास तैयार झाले.

मुलगीला हिवरेत येण्यासाठी हसबे याने जयश्रीला ऑनलाइन ५ हजार रुपये दिले.दि. २७ जुलै रोजी रात्री ९ वाजता संशयित जयश्री गदगे,धनम्मा बिराजदार,सुनिल शहा,आई दीपाली शिंदे आणि मुलगी प्रियांका हे गावात आले.त्याच रात्री दोघांचा विवाह लावुन दिला.यानंतर दि. ३० जुलै रोजी आई दीपालीही हिवरे आली.तिने कपडे घ्यायची आहेत,असे सांगुन मुलीला घेऊन भिवघाटातला गेली.त्यांच्यासोबत दत्तात्रय व नातेवाईक गेले.

दीपालीने भिवघाटातुन मुलीला सोलापूर घेऊन जाण्याची तयारी केली.दत्तात्रयने तिला विचारले असता खोटे लग्न लावुन देण्यासाठी २० हजार रुपये दिल्याचे दीपालीने सांगितले.त्यामुळे आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच नवरदेवाने विटा पोलिसांत जयश्री गदगे,धनम्मा बिराजदार,सुनिल शहा,दीपाली शिंदे आणि प्रियांका शिंदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.त्यानंतर प्रियांका व तिच्या आईला पोलिसांनी अटक केली आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *