सोलापुरात बायको असतानाही बाहेर संबंध ठेवण्याचा छंद, छायाशी अफेअर सुरु झालं अन् घरी भेटायला गेल्यावर….
कोरवली : औंढी (ता. मोहोळ) येथील एका ४५ वर्षे व्यक्तीची धारदार शस्त्राने तोंडावर, डोक्यावर, मानेवर वार करून खून करण्यात आला. या प्रकरणाची माहिती मिळताच कामती पोलिसांनी अवघ्या आठ तासात या प्रकरणाचा छडा लावला. या खूनप्रकरणी कामती पोलिसांनी एका महिलेसह तिच्या साथीदारांना अटक केली. या आरोपींनी अनैतिक संबंधातून ही हत्या केली.
मृत व्यक्ती लक्ष्मण येताळा व्हळगुंडे (वय ४५, रा. औंढी, ता. मोहोळ) याचे कुरुल येथील छाया आबासाहेब वाघमोडे या महिलेसोबत अनेक वर्षापासून अनैतिक संबंध होते. तिचे व मृत लक्ष्मण यांचे सतत आपापसांत भांडण होत होते. तेव्हा मृताचा भाऊ हरी येताळा व्हळगुंडे (रा. औंढी, ता. मोहोळ) यांनी छाया हीस माझ्या भावासोबत भांडण करू नको व प्रेम संबंध सोडून टाकण्यास सांगितले होते.
तेव्हा छाया हिने तुझ्या भावास जीव मारूनच संबंध सोडते असे ठणकावून सांगितले होते. रविवारी (ता. १९) रोजी सायंकाळी मृत लक्ष्मण दिसला नाही म्हणून त्याने मृताची पत्नी उज्वला हीस फोन लावून विचारपूस केली असता मृत लक्ष्मण हा प्रेयसी छाया वाघमोडे यांच्याकडे गेला आहे, असे मृताच्या पत्नीने सांगितले होते.
सोमवारी सकाळी गावचे पोलिस पाटील सीताराम भुसे यांनी घरी येऊन सांगितले की तुझ्या भावाचा कोरवली ते वाघोली शिवेवर खून झाला आहे. ही माहिती मिळताच मृत लक्ष्मणचा भाऊ हरी व इतर नातेवाईक घटनास्थळावर गेल्यावर त्या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती. त्यावेळी मृत लक्ष्मण यांची मोटार सायकल (क्रमांक एम.एच १३ बीएल ०२६१) ही रस्त्यावर लावलेली होती व तिच्यावर रक्त सांडलेले होते.
मोटारसायकलपासून ९० फूट अंतरावर लक्ष्मण हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. त्याच्या तोंडावर, मानेवर व डोक्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. कामती पोलिसांनी मृत लक्ष्मण यास प्राथमिक आरोग्य केंद्र कामती येथे पाठवले असता डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले, अशा प्रकारची फिर्याद मृताचा भाऊ हरी येताळा व्हळगुंडे यांनी कामती पोलिसात दिली असून तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश माने हे करीत आहेत.