सोलापुरात २ वर्षापासुन महिलेचं शेजारच्या मुलासोबत प्रेमसंबंध, ति विसरली पण तो सोडत नव्हता अन् अखेर काल…

सोलापुर : बाॅयफ्रेंडच्या त्रासाला कंटाळुन विवाहितेनी गळफास घेऊन आपलं जीवन संपवल्याचा धक्कादायक प्रकार सोलापुर शहरातुन समोर आला आहे.२ वर्षापासून सुरु असलेल्या प्रेमाचा शेवट अखेर महिलेच्या मृत्यूने झाला आहे.दोघांमधलं प्रेमसंबंध संपुष्टात आले होते.मात्र त्यानंतरही बाॅयफ्रेंड विवाहित प्रेयसीची पाठ सोडत नव्हता.त्यामुळे प्रेयसीने अखेर आत्महत्येसारखं मोठ पाऊल उचललं आहे.

जुना विडी घरकूल येथे राहणाऱ्या कविता कल्याणम या महिलेनी प्रियकराच्या जाचाला कंटाळुन आत्महत्या केली आहे.गेल्या २ वर्षांपासुन कविता कल्याणम हिचे तिच्याचं घराच्या जवळ राहणाऱ्या संदीप राठोड याच्याशी प्रेमसुत जुळले होते.मात्र या प्रेमप्रकरणाबद्दल कविता हिच्या पतीला कळल्यानंतर पतीने आपल्या बायकोला समज देत अशी चुक पुन्हा होऊ नये अशी ताकीद दिली होती.

त्यानंतर दोघातील प्रेमप्रकरण अखेर संपुष्टात आले होते.मात्र बाॅयफ्रेंड संदीप हा मयत कविताला सोडायला तैयार नव्हता.संदीप हा वारंवार कविताला त्रास देत होता.याच जाचाला कंटाळुन कविताने टोकाचं पाऊल उचलत राहत्या घरात गळफास घेत जीवनाचा शेवट केला.दरम्यान याबाबत कविताच्या नातेवाईक आणि शेजारी तसेच रुग्णसेवक रुपेश कुमार भोसले यांनी पोलीस ठाणे गाठत पोलिसांना गुन्हा दाखल केला आहे.

MIDC पोलिसांनी तात्काळ तपास करून संदीपला अटक करावी अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.”सोमवारी सकाळी ६.३० वाजता घरासमोर राहणाऱ्या कविता कल्याणम हिने फाशी घेतल्याचे उघडं झाले.काल सकाळच्या आत्महत्येनंतर गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.कविता यांचे पती तमिळनाडुत होते.नातेवाईकांनी माझ्याकडे न्याय मागण्याचा प्रयत्न केला.

पुढं मी पोलिसांकडून मी या घटनेची सविस्तर माहिती घेतली.त्यानंतर नातेवाईकांसोबत पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल केला.त्यांना न्याय मिळावा हि माझी भुमिका आहे,”असे रुग्णसेवक रुपेशकुमार भोसले यावेळी म्हणाले.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *