स्कुल व्हॅनमधुन खाली उतरली अन् घराच्या दारातचं जीव सोडला, नाशिकमध्ये ८ वर्षाच्या अपेक्षाचा अंत

नाशिक: स्कुल व्हॅनमधुन उतरल्यानंतर त्याच स्कुल व्हॅनच्या चाकाखाली सापडल्याने ८ वर्षीय बालिकेचा शेवट झाल्याची ह्रदयद्रावक घटना नाशिक शहरात घडली आहे.स्कुल व्हॅनमधुन घरी जाण्यासाठी चिमुरडी उतरली खरी,मात्र घरी जात असताना त्याच स्कुल व्हॅनच्या मागच्या चाकाखाली येऊन ८ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

अपेक्षा नवज्योत भालेराव असे मृत मुलीचे आहे.या दुर्दैवी घटनेने भालेराव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.या धक्कादायक घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असुन ड्रायव्हरच्या हलगर्जीपणामुळे स्थानिकांनी संतापही व्यक्त केला आहे.

चालकाने अचानक गाडी रिव्हर्स
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,हि घटना नाशिक शहरातील जेलरोड भागातील पवारवाडी परिसरात घडली आहे.अपेक्षा नवज्योत भालेराव असे या ८ वर्षीय मुलीने यात जीव गमावलाय.अपेक्षा शहरातील एका मराठी शाळेत शिकायला होती.तिला ने-आण करण्यासाठी पालकांनी स्कुल व्हॅनची सोय केली होती.ती रोज याचं स्कुल व्हॅनने शाळेला जात असत.

दरम्यान अपेक्षाला स्कुल व्हॅन घरी सोडण्यासाठी आली होती.स्कुल व्हॅनमधून अपेक्षा खाली उतरुन व्हॅनच्या पाठीमागुन चालली होती.तेवढ्यात ड्रायव्हरने अचानक गाडी रिव्हर्स घेतली.त्यामुळे मागच्या चाकाखाली आल्याने अपेक्षा गंभीर जखमी झाली.तिला उपचारासाठी हाॅस्पिटलमध्ये दाखल केले.मात्र उपचारादरम्यान तिची प्राणज्य़ोत मालवली.या सदर घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.याबाबत ड्रायव्हरविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *