हळद लागली, नवरी आंघोळीला गेली, ती ४० मिनीटं बाहेर आलीच नाही; कुटुंबीयांनी दार ठोठावल्यावर पायचं थरथरले

मेरठ: उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये एक अतिशय दु:खद घटना घडली आहे.लग्नाच्या २ दिवस आधी वधुचा मृत्यू झाला आहे.मुलगी उत्तर प्रदेश पोलीस दलात कॉन्स्टेबल होती.रविवारी घरात हळदीचा कार्यक्रम होता.त्यासाठी नातेवाईक आणि मित्र परिवार जमला.सगळे आनंदात होते.हळदीचा कार्यक्रम रितीरिवाजानुसार संपन्न झाला.

हळद लावण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर गीता तालियान आंघोळीसाठी बाथरुममध्ये गेली.जवळपास ४० मिनिटं होऊनही ती बाहेर आली नाही.त्यामुळे नातेवाईकांना चिंता वाटु लागली.घरातील महिलांनी बाथरुमबाहेर जाऊन आवाज दिला.दरवाजा ठोठावला,मात्र आतुन कोणताच प्रतिसाद मिळाला नाही.त्यामुळे अखेर दार तोडण्यात आलं.त्यावेळी गीता बेशुद्धावस्थेत दिसली.त्यानंतर लगेचच डॉक्टरांना बोलावण्यात आलं तर डॉक्टरांनी गीताला तपासुन मृत घोषित केलं.आनंदात रमलेल्या कुटुंबावर क्षणात शोककळा पसरली.

लग्न अवघ्या २ दिवसांवर आलं असताना नववधुचा मृत्यू झाल्यानं कुटुंबासह नातेवाईकांना जबर धक्का बसला आहे.घटनेबद्दल समजताच पोलीस पोहोचले.मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.शवविच्छेदन अहवाल मिळाल्यानंतरच मृत्यूचं नेमकं कारण समजु शकेल,अशी माहिती पोलिसांनी दिली.

२०११ मध्ये पोलीस दलात भरती
सरधनातील अहमदाबाद गावात राहणारी गीता उत्तर प्रदेश पोलीस दलात कार्यरत होती.सध्या ती मुझफ्फरनगर दक्षता पथकात काम करत होती.गीता २०११ मध्ये पोलीस दलात भरती झाली.२६ फेब्रुवारीला तिचा विवाह होता.घरात लग्नाचे विधी चालु होते.रविवारी हळदीचा कार्यक्रम झाला.तो मोठ्या थाटामाटात आणि आनंदात पार पडला.त्यानंतर गीता आंघोळीसाठी बाथरुममध्ये गेली अन् तिथेच तिनं शेवटचा श्वास घेतला.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *