हातात हाथ घालुन भावडांनी प्राण सोडला,😥 हजारों गावकर्यांना कोसळलं रडु; हिंगोलीतील घटना

हिंगोली: कळमनुरी तालुक्यामध्ये असलेल्या शेवाळा येथे पाच वर्षाचे दोन मुलांचा नदीच्या पात्रात बुडून दुर्दैवी अंत झाला असल्याची घटना उघडकीस आली आहे.फोटोमध्ये दिसत असलेली ही जोडी जिवंतपणे हातात हात घालून तर दिसतच आहे. मात्र मृत्यूनंतर देखील एकमेकांना वाचवताना हातात हात पकडून कायमची जग सोडून गेले असल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शेवाळा येथील शिवराज संदीप सूर्यवंशी (५) आणि स्वराज दीपक सूर्यवंशी (५) वर्षाचे ही चुलत भाऊ सकाळी गावातील हनुमान मंदिराकडे असलेल्या देवीच्या दर्शनासाठी गेले होते. आपल्या आईसोबत देवीच्या दर्शनासाठी ही दोन्ही चिमुकले गेल्यावर रोजच्या प्रमाणे आईला सांगितले की, आम्ही काही वेळ येथे खेळतो.

नंतर परत घराकडे येतो असे म्हणून ही मुले खेळण्यासाठी मंदिराच्या परिसरात खेळत होती. नंतर काही वेळाने जवळच असलेल्या कयाधू नदी पात्राकडे खेळत गेली. नदीवर खेळताना त्या ठिकाणी नदीच्या पाण्यात पाय घसरून पडल्याने यातच या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

सकाळी ११ वाजण्याच्या सुमारापासून स्वराज आणि शिवराज नात्याने चुलत भाऊ असलेले दोघेजण उशिरापर्यंत घराकडे आले नसल्याने आई-वडिलांनी आणि गावातील नागरिकांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. मुले कुठेच दिसत नसल्याने नांदेडपर्यंत जाऊन मुलांचा शोध घेतला. मात्र मुले मिळून येत नसल्याने अखेर बाळापुर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपीनवार उपनिरीक्षक शिवाजी बोंडले यांना माहिती देण्यात आली. लागलीच पोलीस पथकांनी तात्काळ या परिसरात शोध घेण्यास सुरुवात केली.

रात्री सात वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी व गावकऱ्यांनी मिळून नदीच्या परिसरात पाहणी केली. या नदीच्या परिसरात लहान मुलांच्या पायाच्या खुणा आढळत असल्याने संशय व्यक्त करण्यात आला. या भागात नदीपात्रात पाहणी केली असता पाय घसरून पडल्याचा संशय व्यक्त केला गेला. गावकऱ्यांनी पाण्यात शोध घेतला असता दोघांचेही मृतदेह या ठिकाणी आढळून आले. दोघांचेही मृतदेह बघून कुटुंबाने हंबरडा फोडला. फोटोत जशा पद्धतीने दिसत आहेत. त्याच पद्धतीने हातात हात घालून दोघांनी आपला अखेरचा प्राण सोडला. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *