हा कुठला बाई Romance? स्कूटी चालवताना मागे बसलेल्या गर्लफ्रेंडच्या गळ्यात हात घालुन ओढलं अन् लोक…

Couple Romance On Bike: धावत्या दुचाकीवर रोमान्स करतानाचे व्हिडीओ अनेकदा समोर येत असतात. स्वत:बरोबरच इतरांचा जीवही धोक्यात घालून केला जाणारा हा वेडेपणा पाहून अनेकांच्या तळपायाची आग मस्तकात जाते. असाच एक चिड आणणारा व्हिडीओ पुन्हा एकदा समोर आला असून तो व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक जोडपं स्कूटीवर अगदी बाजूबाजूला बसल्याप्रमाणे बसून प्रवास करताना दिसत आहे. एखाद्या चित्रपटगृहामध्ये किंवा बागेतील बाकड्यावर गळ्यात गळा घालून निवांत गप्पा मारताना बसावं अशापद्धतीने हे जोडपं दुचाकीवर बसून प्रवास करताना दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी या दोघांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

पुढे बसून मागे बसलेलीच्या गळ्यात हात
व्हायरल झालेला हा व्हिडीओ दिल्लीमधील असल्याचं सांगितलं जात आहे. एका पांढऱ्या रंगाच्या स्कूटीवर प्रवास करणारं हे जोडपं वाहतुकीच्या अनेक नियमांचं उल्लंघन गर्दीतून जाताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये स्कूटी चालवणारा तरुणाने एक हात त्याच्या मागे बसलेल्या तरुणीच्या गळ्यात घातल्याचं दिसत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ पाहून हे दोघं गाडीवर बसलेत की चित्रपटगृहामध्ये असा प्रश्न विचारताना दिसत आहेत. कारण गाडीवर दोघेहीजण ज्या पद्धतीने आरामात मागे पुढे बसून एकमेकांच्या गळ्यात हात घालत आहेत ते पाहून नक्कीच तुम्हालाही आश्चर्य वाटेल. या स्कूटीच्या मागे चालणाऱ्या कारमधून हा व्हिडीओ शूट करण्यात आल्याचं स्पष्ट होत आहे.

4 लाखांहून अधिक व्ह्यूज
हा व्हिडीओ व्हायरल झाला असला तरी तो नक्की कुठला आहे, कोणी शूट केला आहे, गाडीवरील जोडपं कोण आहे हे प्रश्न अनुत्तरितच आहेत. इन्स्ताग्रामवर शलू कश्यप नावाच्या व्यक्तीने शेअर केला आहे. “दिल्लीतील रस्त्यावरील इश्क आणि रिस्क” अशा कॅप्शनसहीत हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला 4 लाख 11 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

लोकांच्या उपहासात्मक प्रतिक्रिया
या व्हिडीओवर अनेकांनी मजेदार प्रतिक्रिया नोंदवताना या जोडप्याला ट्रोल केलं आहे. लोकांना दोघांचं सुख पहावत नाही म्हणून असे व्हिडीओ व्हायरल केले जातात, अशी उपहासात्मक प्रतिक्रिया एकाने नोंदवली आहे. तर अन्य एकाने, जेव्हा यमराज सुट्टीवर असतो तेव्हाच असं प्रेम उफाळून येतं असं म्हटलं आहे. मात्र अशाप्रकारे वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करुन गाडी चालवणे कायद्याने गुन्हा आहे. यासाठी मोठ्या दंडाबरोबरच शिक्षाही होऊ शकते. अनेकदा पोलिसांकडून यासंदर्भातील जागृती केली जात असली तरी नियमांचं उल्लंघन करुन तरुण असा वेडेपणा करताना दिसतात.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *