हिंगोलीत सकाळी रनिंगसाठी घराबाहेर पडली अन् तासाभरात बाॅडी सापडली, पोलिस होण्याचं स्वप्नं संपल

हिंगोली – हिंगोली जिल्ह्यातील चोंढीफाटा ते औंढा मार्गावर पोलिस भरतीसाठी धावण्याचा प्रॅक्टिस करणाऱ्या मुलीला कारने पाठीमागुन धडक दिली.या अपघातामध्ये तरुणी १० ते १२ फूट उंच उडुन खाली पडली.त्यात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिना जागीचं प्राण सोडले.गुरुवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास हि घटना घडली आहे.कन्याकुमारी कृष्णा भोसले(वय १९ वर्ष, आंबा,ता.वसमत) असे मृत तरुणीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,वसमत तालुक्यातील आंबा येथील कन्याकुमारी भोसले व तिच्या २ मैत्रिणी चोंढी फाटा ते औंढा मार्गावर धावण्याची प्रॅक्टीस करीत होत्या.यावेळी२ मैत्रिणी पुढे धावत होत्या तर कन्याकुमारी मागे होती यावेळी एका पेट्रोल पंपाजवळ पाठीमागुन भरधाव वेगाने येणाऱ्या गाडीने कन्याकुमारीला जबर धडक दिली.

या धडकेमुळे ती सुमारे १०-१२ फुट उंच उडाली अन् रस्त्यावर पडली.या अपघातानंतर कार ड्रायव्हरने कार थांबवुन तिला पाहिले,मात्र तिच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तिचा जागीचं मृत्यू झाल्याचे कळताचं तो कारसह पसार झाला.सदर प्रकार परिसरातील आखाड्यावर असलेल्या एका व्यक्तीने हे पाहिले.त्याने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

समोर धावणाऱ्या मैत्रिणींना मोठ्यांनी ओरडल्याचा आवाज आल्यामुळे त्यांनी मागे पाहिले असता कन्याकुमारी रस्त्यावर पडलेली दिसली.या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आजुबाजुच्या लोकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.तसेच कुरुंदा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.मृत कन्याकुमारीचा मृतदेह वसमतच्या उपजिल्हा हाॅस्पिटलमध्ये दाखल केला आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *