हिंगोलीत हळद काढतांनी २५ वर्षाच्या शेतकर्यानी गमावले प्राण, तरुणासोबत इतकं वाईट घडेल कोणी विचारही केला नसेल
हिंगोली – मराठवाड्यासह राज्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तशा सतर्क राहण्याचा सूचनाही प्रशासनाने दिल्या होत्या. अवकाळी पावसाने नुकसान होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी वेळीच योग्यती खबरदारी घेण्याच्या आवाहन केले होते. वर्तवलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात वातावरणात कमालीचा बदल झाला आहे.
आज सकाळपासून जिल्ह्याच्या विविध भागात विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक सुरू झालेल्या पावसाने मात्र हळद उत्पादक शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. तर काही शेतकऱ्यांची हळद या पावसामध्ये भिजली देखील आहे.दरम्यान अवकाळी पावसाने जिल्ह्यात पुन्हा तडाखा दिला आहे.
शेतात काढणीचे काम सुरु असल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील बोरजा येथे हळद काढत असताना वीज कोसळून पीराजी विठ्ठल चव्हाण ( २५ ) या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला.शेतात हळद काढणीचे काम सुरू असताना अचानक पावसाने हजेरी लावली. दुपारी वादळवाऱ्यासह वीजाच्या कडकडाटात पाऊस सुरु झाल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली.
मागील महिन्यात देखील अवकाळीचा फटका पिकांना बसला होता. आज नर्सी नामदेव, कडोळी, जवळा पांचाळ, केंद्रा बु येथे पाऊस झाला. यावेळी हळद उत्पादक शेतकऱ्यांची धावपळ उडाली.तसेच कळमनुरी, कुरुंदा येथे रिमझिम पाऊस झाला. दरम्यान, औंढा नागनाथ तालुक्यातील बोरजा येथे शेतामध्ये हळद काढणी सुरु होती. यावेळी अचानक पाऊस सुरु झाला.
वीज कोसळून पीराजी विठ्ठल चव्हाण या तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. घरातील कर्ता व्यक्ती गेल्याने चव्हाण यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. अजूनही पावसाची सध्या संकट टळली नाहीये. सकाळपासून सूर्यदर्शन झाले नसून अजूनही पाऊस पडेल असा अंदाज आहे. प्रशासनाने वादळी वाऱ्याच्या धडाक्यापासून वाचण्यासाठी दिलेल्या सूचनांचे पालन करणे देखील तितकाच महत्त्वाच आहे.