हि बुधवार पेठ काय भानगड आहे रे भावा? कुतूहलाने मित्रासोबत पहायला गेला अन् चांगलाच दणका बसला
पुणे शहरात मध्यवर्ती असलेली बुधवार पेठ ही वेश्या व्यवसायासाठी दुर्दैवाने प्रसिद्ध असून बाहेरून आलेल्या व्यक्तींमध्ये याबाबत मोठ्या प्रमाणात आकर्षण पहायला मिळते. पुणे येथील एका महाविद्यालयात शिकत असलेले दोन तरुण केवळ गंमत आणि कुतूहल म्हणून बुधवार पेठेत फिरायला गेले त्यावेळी तेथील चोरट्यानी त्यांना मारहाण केली आणि त्यांचे चाळीस हजार रुपयांचे मोबाईल पळवून नेले .
उपलब्ध माहितीनुसार , तक्रारदार हे मांजरी येथील एका होस्टेलवर राहत असून त्यासंदर्भात वीस वर्षाच्या एका तरुणाने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुचाकीवर आलेल्या तीन जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला असून श्रीकृष्ण टॉकीजजवळ ढमढेरे गल्ली इथे तीन मे रोजी पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडलेली आहे.
फिर्यादी व्यक्ती हा पुण्यातील एका कॉलेजमध्ये शिकत असून मांजरीत एका हॉस्टेलवर राहायला आहे. मध्यरात्रीनंतर मित्रासोबत कोथरूडला जेवायला जात असताना त्याला बुधवार पेठ ही काय भानगड आहे ही पाहण्याची जिज्ञासा मनात निर्माण झाली आणि तो मित्रासोबत तिथे पोहोचला त्यावेळी त्याच्यासोबत हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे .