होळीच्या दिवशी प्रेमाचं पुन्हा भान हरपलं, बाईकवरच गठ्ठ मिरत किसींग व्हिडीओ व्हायरल

Couple Romance on Bike Viral Video : बुरा न मानो, होली है…! असं होळीला म्हटलं जातं. अख्खा देश रंगाच्या उत्सवात न्हावून निघाला होता. प्रत्येकावर होळीचा रंग चढलेला दिसला. अशातच एक प्रेमी युगुलावर प्रेमाचा (Romance Video) रंग चढलेला दिसला. होळीच्या दिवशी हे प्रेमवीर दिवसा बाइकवर एकमेकांच्या मिठीत रमले होते. त्यांचा हा बाइकवरील रोमान्स (video viral on social media) अख्ख शहर पाहत होतं. या वर्षाची सुरुवातच कधी बाइक, तर कधी स्कुटी तर कधी कारचा रूफ टॉपवर कपल रोमान्स (boyfriend girlfriend video) करताना दिसून आले. सोशल मीडियावर हे व्हिडीओ ट्रेंडिंगमध्ये आहेत. आता अजून एक व्हिडीओ समोर आला आहे.

हद्द केली राव!
व्हिडीओमध्ये एक तरुण बुलेट चालवताना दिसत आहे. तर तरुणी पेट्रोल टाकीवर बसून त्या तरुणाला मिठी मारून बसली आहे. अधूनमधून ती तरुणी तरुणाला किस (couple kissing video) करताना दिसतं आहे. धक्कादायक म्हणजे या दोघांनीही हेल्मेट घातलेला नव्हता. होळीचा रंग या दोघांवर चढला होता असं दिसतं होतं. होळीच्या दिवशी प्रेमीयुगुलानं मर्यादा ओलांडल्या आहेत. अश्लिलतेचं असं प्रदर्शन पाहून नेटकऱ्यांनी त्यांना धारेवर धरलं आहे. बाइकवर कपलचे हे चाळे रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आहेत.

कुठलीही आहे घटना?
हा व्हिडीओ ट्वीटरवर Jitesh Jethanandani या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ राजस्थानमधील जयपूरमधील आहे. जो सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.

पहिलाच व्हिडीओ नाही…
खरं तर ही पहिलीच घटना नाही. असे अनेक घटना गेल्या काही महिन्यात समोर आल्या आहेत. पोलिसांचा धाक राहिला नाही असं काहीस चित्र दिसतं आहे. अगदी काही दिवसांपूर्वीच अजमेर जिल्ह्यातील एक व्हिडीओ समोर आला होता. त्यातही कपल बाइकवर रोमान्स करताना दिसले होते.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे. बाइकवर असे रोमँटिक स्टंट करणे हा कपल सोबत रस्त्यावरून जाणाऱ्या इतर लोकांसाठी घात ठरु शकतात.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *