१० लोक ठार होईल इतकं ड्रग्स आईना दुधातुन बाळाला पाजलं, मग शांत झाली ; म्हणाली- मी खुप थकले होते, मला…

उत्तर प्रदेशाच्या गाजियाबादमध्ये 9 महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बाळाच्या आईने कथितपणे बाळाच्या दुथात फेंटेनाइल (एक प्रकारचं ड्रग) मिसळलं होतं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 जूनला कैपाहुन येथील घऱात बाळ बेशुद्ध अवस्थेत सापडलं होतं.

सीपीआरच्या माध्यमातून मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण हे प्रयत्न अपयशी ठरले. रुग्णालयात बाळाचा मृत्यू झाला. बाळाच्या 17 वर्षीय आईने सुरुवातीला पोलिसांना नेमकं काय झालं याची आपल्याला काहीच माहिती नसल्याचं सांगितलं. पण नंतर धक्कादायक खुलासे समोर आले.

मुलाच्या दुधात होतं 10 लोकांना ठार करेल इतकं फेंटेनाइल
बाळाच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं असता, त्याच्या शरिरात 10 लोकांना ठार करु शकतं इतकं फेटेंनाइल होतं अशी धक्कादायक माहिती समोर आली. मंगळवारी चौकशी करण्यात आली असता, बाळाच्या आईने जे सांगितलं ते ऐकून पोलीसही हादरले. ज्या दिवशी बाळाचा मृत्यू झाला, त्या दिवशी मी फार थकले होते. मला झोपायचं होतं, आणि बाळ सतत रडत होतं. यामुळे मी बाळाला झोपवण्यासाठी दुधात फेटेनाइल मिसळलं अशी माहिती तिने दिली.

“मला वाटलं हे फक्त कोकेन आहे, आणि बाळ झोपी जाईल”
बाळाच्या आईने तिने एका बाटलीत दुधासह फेटेंनाइल मिसळलं होतं. पण आपल्याला ते कोकेन आहे असं वाटलं असा तिचा दावा आहे. मला वाटलं होतं बाळ त्याच्याने झोपी जाईल असं तिचं म्हणणं आहे. पोलीस तिने दिलेल्या माहितीची पडताळणी करत आहेत.

“कोणती आई असं कृत्य करेल? ती नक्की आजारी आहे”
या घटनेने पोलिसांनाही धक्का बसला आहे. पोलिसांनी पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “असं कोण करतं? कोणती आई असं कृत्य करेल? ही सामन्य बाब नाही. ही महिला आजारी आहे. एक आई आपल्या बाळासह असं कृत्य कसं काय करु शकते हे माझ्या समजण्यापलीकडे आहे. या धोकादायक ड्रगमुळे कोणाचाही जीव जाता कामा नये. खासकरुन लहान मुलांचा”.

आरोपी आईचं नाव मिनाबाई चिप्पीनर असं आहे. दरम्यान तिच्यावर हत्या आणि बंदी घालण्यात आलेलं ड्रग ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. तसंच त्या भागात अन्य पालकांकडेही हे ड्रग आहे का याची चाचपणी केली जात आहे. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *